*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा लालीत्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आठवणींच्या गाठी*
अलगद सुटल्या आठवणींच्या त्या गाठी
अन् हसले अश्रू झुकल्या पापण काठी ||धृ||
मंतरलेले दिस अजूनी मज स्मरती
हाती धरलेले ते हात तुझे आठवती
जाता जाता सखे तू वळुनी पाहिले पाठी
अन् हसले अश्रू झुकल्या पापण काठी ||१||
मी कानात बोललो गूज माझिया मनीचे
समजले कुठे गं शल्य तुज ह्रदयीचे
भावनांची नंतर झाली मनांगणी दाटी
अन् हसले अश्रू झुकल्या पापण काठी ||२||
मिठीत घेतले मी कितीदा तुला स्वप्नांनी
आणिक चुंबिलेले अधरांसी अधरांनी
डोळ्यांत दाटलेले तेव्हा प्रेम मजसाठी
अन् हसले अश्रू झुकल्या पापण काठी ||३||
©दीपक पटेकर (दीपी)
सावंतवाडी
८४४६७४३१९६