कणकवली
कणकवली शहरात पंचायत समितीकडे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या स्वच्छतेसाठी आता कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे हे स्वतः पुढाकार घेणार आहेत. चौपदरीकरण अंतर्गत शहरात हायवेचे काम सुरू असल्याने छत्रपतींच्या पुतळ्या वर धूळ बसते. छत्रपतींच्या पुतळ्याचा स्थलांतरणाचा प्रश्न अद्याप मार्गी लागला नसल्याने छत्रपतींच्या पुतळ्याची नियमित स्वच्छता निर्णय श्री नलावडे यांनी घेतला आहे. कणकवली शहरातील महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्ण होत धुळीचा त्रास बंद होईपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची नियमित स्वच्छता करण्याचा करण्याचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी निश्चित केले आहे. छत्रपतींच्या पुतळ्याच्या स्वच्छतेसाठी रोज एक कर्मचारी पुतळ्या वरील धुळीची स्वच्छता करेल असेही नलावडे यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहे. गेले अनेक दिवस या पुतळ्याच्या स्थलांतरण संदर्भात वाट पाहिली. मात्र हा प्रश्न मार्गी लागत नसल्याने यात राजकारण न आणता कणकवली चा प्रथम नागरिक म्हणून मी स्वतः छत्रपतींच्या पुतळ्याच्या स्वच्छतेची जबाबदारी उचलत असल्याचे पुढाकार घेत असल्याचे नलावडे यांनी स्पष्ट केले. पुतळ्याची नियमित स्वच्छता करत छत्रपतींच्या सेवेची संधी म्हणून हे काम करण्यात येणार असल्याचे श्री नलावडे यांनी सांगितले.