You are currently viewing दोडामार्ग तालुका पर्यटन विकास संस्थेची आज झाली स्थापना, रोजगार उभारणीसाठी नवा आयाम…

दोडामार्ग तालुका पर्यटन विकास संस्थेची आज झाली स्थापना, रोजगार उभारणीसाठी नवा आयाम…

दोडामार्ग तालुका पर्यटन विकास संस्थेची आज झाली स्थापना, रोजगार उभारणीसाठी नवा आयाम…

दोडामार्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या टोकाला असणाऱ्या दोडामार्ग तालुक्यात रोजगार निर्मिती ही औद्योगिक उद्योग आणि पर्यटन विकास याच्या माध्यमातून व्हावा यासाठी
‘दोडामार्ग तालुका पर्यटन विकास संस्था’ स्थापन करण्यात आली. ही संस्था दोडामार्ग तालुक्यात रोजगार उभारणीची नांदी ठरेल असे यावेळी आश्वासित करण्यात आले. महत्वाचे म्हणजे पहिल्या टप्प्यात आडाळी येथे एम.आय. डी. सी. तुन उद्योग उभारणी आणि तिलारी धरण परिसर विकास या दोन आयामावर ही संघटना काम करणार आहे. त्याचबरोबर संघटना संपूर्ण तालुकाभर प्रत्येक गावातून संघटनेत सदस्य सामाविष्ठ करण्यात येतील असेही सांगण्यात आले.
यावेळी सुरुवातीला विकासात्मक मतांवर चर्चा करण्यात आली. उपस्थितानी तालुक्यातील रोजगार शक्तीस्थळे यावर आपली मते मांडली त्यानंतर संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेऊन उद्दिष्ट निश्चित करण्यात आली.या संस्थेच्या अध्यक्षपदी तेजस देसाई यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.तर सचिवपदी जवाद हुसेन खतीब यांची व खजिनदार म्हणून जय भोसले यांची निवड करण्यात आली.
कार्यकारणी अशी आहे,
अध्यक्ष तेजस देसाई,कार्यकारी अध्यक्ष पंकज गवस, उपाध्यक्ष मिलिंद नाईक,संदेश वरक,सचिव जवाद खतीब, सहसचिव अमोल परब,खजिनदार जय भोसले तर सदस्य म्हणून पराग गावकर,वैभव इनामदार,प्रवीण गावकर,विठोबा गावकर,राजन गावकर,संतोष गवस,महेंद्र गवस,रवींद्र खडपकर व पराशर सावंत.
बॉक्स
विकास प्रकल्प उभारणीशिवाय थांबणार नाही…
दोडामार्ग तालुका नेहमीच सर्व बाबतीत उपेक्षित राहिला आहे.रोजगार असो किंवा आरोग्याचा प्रश्न किंवा इतर मूलभूत सोयी सुविधा.नेहमीच संघर्ष व आंदोलने ही दोडामार्गातील जनतेला करावीच लागतात.तालुक्यात भेडसावणारा गंभीर प्रश्न आहे तो रोजगारीचा.तालुक्यातील युवकांना शाश्वत रोजगार मिळावा आणि तोही तालुक्यातच या अनुषंगाने या संस्थेची निर्मिती करण्यात आली आहे.या संस्थेच्या माध्यमातून दोडामार्ग तालुक्यातील दुर्लक्षित पर्यटनाचा विकास करून त्यातून शासनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश आहे.दोडामार्ग तालुक्यात विकासाचे प्रकल्प निर्माण करण्याचा ध्येय घेऊन ही संस्था काम करणार असून विकास प्रकल्प निर्मिती केल्याशिवाय थांबणार नाही असा निर्धार व्यक्त करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा