मुळदे महाविद्यालयाकडून महामार्गावर वृक्षारोपण…
वृक्षदिंडी काढून जनजागृती; कुडाळ तहसीदारांच्या हस्ते दिंडीचे उद्घाटन…
कुडाळ
मुळदे येथील उद्यानविद्या महाविद्यालयाच्या वतीने आज मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ ते पिंगळी दरम्यान विविध प्रकारचे वृक्ष लागवड करण्यात आले. दरम्यान वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त वृक्ष लागवड करा, असे आवाहन कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी केले. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाच्या वतीने शहरातून वृक्षदिंडी आणि पथनाट्य सादर करून वृक्षारोपणा बाबत जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमाची सुरूवात कुडाळ हायवे बसस्थानक येथे वृक्षपालखीची पूजा करून वृक्षदिंडी रॅलीची सुरूवात करण्यात आली. यावेळी संत राऊळ महाराज महाविद्यलयाचे प्राचार्य डॉ. लोखंडे, डॉ. गिरीश राणे, बांधकाम व्यवसायीक गजानन कांदळगावकर, कुडाळ सायकल असोसिएशनचे रुपेश तेली, शिवप्रसाद राणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी याचे स्वीय सहाय्यक अमित तेंडोलकर, अँड. राजीव बीले, रोटरीयन राजू केसरकर, कुडाळ पत्रकार संघाच्या सचिव वैशाली खानोलकर, मुळदे उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डाॅ. प्रफुल्ल माळी, मत्स्य संशोधन व संवर्धन केद्राचे प्रमुख डॉ.नितीन सावंत आदी उपस्थित होते.