You are currently viewing महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोकणातील जनतेसाठी विकासपर्व

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोकणातील जनतेसाठी विकासपर्व

*महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोकणातील जनतेसाठी विकासपर्व

*विष्णू मोंडकर, जिल्हा प्रवक्ते भाजपा सिंधुदुर्ग*

लोकसभा निवडणुकीत कोकणातील जनतेने पाचही खासदार निवडून देऊन महायुतीस साथ दिली राज्य सरकारच्या वतीने
राज्याच्या अर्थसंकल्पात कोकणातील जनतेच्या मनातील विकासपर्वाची आश्वासक पूर्तता केली असल्याने महाविकास आघाडी च्या कार्यकर्त्याचे नेत्याचे मनोबल खचले असून त्यांच्या पायाखालील जमीन सरकली आहे भ्रमनिरास होऊन जनतेची दिशाभूल करणारी विधाने त्यांच्या कडून केली जात आहेत.राज्यांचा अर्थसंकल्पात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शाश्वत सागरी पर्यटन विकासाच्या दृष्टीने आंतराष्ट्रीय स्कुबाडायव्हिंग स्कुल साठी 20 कोटी तसेच तसेच पर्यटन पाणबुडी प्रकल्पाला 66 कोटी मंजुरी,कातळ शिल्प संवर्धना साठी युनोस्को कडे पाठपुरावा तसेच उद्योग विकास केंद्रासाठी भरीव तरतूद आई योजनेच्या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्या महिला व्यावसायिकांसाठी व्याज माफी ,आर्थिक दुर्बल गटातील महिलासाठी 3 गॅस सिलेंडर मोफत शेतकऱ्याच्या दूध उत्पादन वाढीसाठी प्रति लिटर 5 रुपये मदत,बचत गटाच्या निधीत 15 हजार रुपये वरून 30 हजार रुपये वाढ केली असून व्यवसाययिक शिक्षणात मुलींचे प्रमाण वाढण्यासाठी 8 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक कौटूंबिक उत्पन्न असणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना 100%प्रतिपूर्ती करण्याची मंजुरी दिली ,वन्य प्राणी पासून जीवित हानीस नुकसान भरपाई 25 लाख रुपयापर्यंत वाढविण्यात आली आहे ,महिला व बालकाविरुद्ध अत्याचाराचे खटले साठी 100 विशेष जलदगती न्यायालयाची आवश्यक निधी राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे शेतकरी वर्गासाठी 7.5 अश्वशक्ती क्षमतेच्या शेती पपांना मोफत वीज पुरविली जाणार आहे तसेच मागेल त्याला सौरऊर्जा पम्प उपलब्ध केले जाणार आहेत तसेच सगळ्यात महत्वाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनची अंबालबजावणी 21 ते 60 वर्षापर्यंत पात्र महिला भगिनीस दरमहा 1500 रुपये दिले जाणार असून महिला वर्गासाठी सम्मान योजना राबविली जाणार आहे.महायुतीचे नेते मा.खासदार श्री नारायणजी राणे साहेब ,सार्वजनिक बांधकाम मंत्री ,जिल्ह्याचे पालकमंत्री श्री रवींद्रजी चव्हाण साहेब शालेय शिक्षण मंत्री श्री दिपकजी केसरकर तसेच आमदार श्री नितेशजी राणे साहेब यांच्या सहकार्यानेच
जनतेस अपेक्षित असलेला हा अर्थ संकल्प जनतेच्या मनातील आशा अपेक्षा पूर्ण करणारा ठरणारा असून येणाऱ्या विधानसभेत महायुतीचे म्हणजे सर्व सामन्याचे सरकार निर्विवाद बहुमताने बनेल असा विश्वास श्री विष्णू मोंडकर भाजपा प्रवक्ते सिंधुदुर्ग यांनी व्यक्त केला आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा