महायुती सरकारने जाहीर केलेला अर्थसंकल्पहा हा सर्व घटकांना न्याय देणारा – सौ. श्वेता कोरगावकर
महिला भगिनी आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यास बळ मिळेल..
बांदा
महायुती सरकारने जाहीर केलेला अर्थसंकल्प हा सर्व समावेशक आणि सर्वच घटकांना न्याय देणारा आहे. महिला, माता भगिनी याना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये देण्याचा क्रांतिकारी निर्णय आमच्या महायुती सरकारने घेतलेला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यातील महिला भगिनी आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यास बळ मिळेल. असा विश्वास भाजपच्या महिला मोर्चाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना व्यक्त केला.
मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेत दरमहा १५०० रुपये मिळणार असून यासाठी शासन दरवर्षी ४६ हजार कोटी रुपये निधी उपलब्ध करून देणार आहे. ही योजना जुलै २०१४ पासून कार्यान्वित होणार आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला तीन सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत. याचा लाभ राज्यातील ५२ लाख १६ हजार ४१२ कुटुंबाना मिळणार आहे. त्यामुळे सर्वसमावेशक व महिला वर्गासाठी हा अर्थसंकल्प लाभदायी ठरणार असल्याचे सौ. कोरगावकर यांनी सांगितले.