सिंधुदुर्ग :
राज्यपाल यांच्या अभिभाषणातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेली गंभीर स्थिती बाबत आमदार वैभव नाईक यांनी विधानसभा सभागृहात आज माहिती दिली.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपला दवाखाना हे बंद स्थितीत आहेत.त्याठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसतात ओपिडी होत नाहीत. याकडे सभागृहाचे लक्ष वेधले असता त्यावर हरकत घेत भाजप सरकारचे अपयश झाकण्याचा प्रयत्न आ. नितेश राणे यांनी केला. मात्र त्यावर आमदार वैभव नाईक यांनी मी त्यांच्याबरोबर येण्यास तयार आहे. उद्या आम्ही दोघेही जिल्ह्यात असू तेव्हा किती दवाखाने चालू आहेत ते मला त्यांनी दाखवावावेत असे आव्हानच आमदार वैभव नाईक यांनी सभागृहात दिले. दवाखाने चालू राहिले पाहिजेत अशी आमची अपेक्षा आहे असेही त्यांनी सांगितले.