You are currently viewing राष्ट्रवादी महिला अध्यक्ष अर्चना घारे यांच्या माध्यमातून ‌ वेंगुर्ल्यात उद्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

राष्ट्रवादी महिला अध्यक्ष अर्चना घारे यांच्या माध्यमातून ‌ वेंगुर्ल्यात उद्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

राष्ट्रवादी महिला अध्यक्ष अर्चना घारे यांच्या माध्यमातून ‌ वेंगुर्ल्यात उद्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

वेंगुर्ले

संसदरत्न सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला राष्ट्रवादी काँग्रेस व अर्चना फाउंडेशनच्या संस्थापक तथा कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे यांच्या माध्यमातून ३० जुलैला येथील साई डीलक्स हॉल सुंदरभाटले येथे दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्षाद शेख, महिला प्रदेश उपाध्यक्ष नम्रता कुबल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख माजी सभापती यशवंत उर्फ बाळू परब आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व विद्यार्थी, पालक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष योगेश कुबल शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा