You are currently viewing ग्रामसचिवालय म्हणजे गावाचे भूषण:

ग्रामसचिवालय म्हणजे गावाचे भूषण:

– शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ

पाडलोस ग्रामसचिवालयाचे भूमिपूजन

सावंतवाडी 

गेली अनेक वर्षे विरोधकांकडे सत्ता होती परंतु शिवसेनेकडे सत्ता आल्यानंतर गावाचे भूषण असलेले ग्रामसचिवालय तुम्ही उभे करता आहात हे अभिमानास्पद आहे. ज्या जनतेने विकासाच्या भावनेतून तुम्हाला सत्तास्थानी बसविले त्या भावना व अपेक्षा तुम्ही पूर्ण करा. त्यासाठी लागणारे सर्वतोपरी योगदान शिवसेना देईल, असे प्रतिपादन पं.स.सदस्य तथा शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केले.
पाडलोस ग्रामसचिवालयाच्या नवीन इमारत भूमिपूजनप्रसंगी श्री.राऊळ बोलत होते. यावेळी जि.प.सदस्य राजन मुळीक, उपतालुकाप्रमुख राजू शेटकर, सरपंच अक्षरा पाडलोसकर, मळेवाड युवासेना विभागप्रमुख समीर नाईक, ग्रा.पं.सदस्य लिना माधव, रामा नाईक, तंटामुक्त समिती अध्यक्ष मधुकर परब, युवासेना शाखाप्रमुख रोहित गावडे, माजी ग्रा.पं.सदस्य लिंगाजी पाडलोसकर, ग्रामसेवक चंद्रकांत शेडगे तसेच ग्रामस्थ अमोल नाईक, निखील परब, श्रीधर परब, बाबु कुबल, लवु गावडे, शिवराम पाडलोसकर, ठेकेदार व पुरोहित श्री.पणशीकर आदी उपस्थित होते. .
राजू शेटकर म्हणाले की, बारा लाख रुपयांच्या निधीतून ग्रामसचिवालय पूर्ण होणार नसून त्यासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे.

तसेच गावातील जनतेने ज्या विश्वासाने आम्हाला सत्तास्थानी बसविले तो विश्वास अनेक विकासकामे करत आम्ही मार्गी लावत आहोत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक राजू शेटकर यांनी तर आभार सरपंच अक्षरा पाडलोसकर यांनी मानले.

..तर अतिरिक्त निधी देऊ ः राजू मुळीक

सुसज्ज भव्य-दिव्य अशी ग्रामसचिवालयाची इमारत उभी करण्यासाठी जो काही अतिरिक्त निधी लागेल तो आपण देणार. तसेच कुठच्याही प्रकारे निधीची कमतरता भासल्यास पालकमंत्री, खासदार, आमदारांचे याकडे लक्ष वेधून विकासाभिमुख ग्रामसचिवालय पूर्ण करू असे आश्वासन, जि.प.सदस्य राजन उर्फ राजू मुळीक यांनी दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा