You are currently viewing मृगधारा

मृगधारा

*डॉ.शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे (मुक्ताई नगर) सन्मा. सदस्य कवी मनोहर पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मृगधारा💧💧🫧*

________________

बीज राणात

निजले …….

काळ्या मातीच्या

. कुशीत…..

 

उब मायेची

मिळाली …….

प्राण ओतले

कोंबात ………

 

बीज अंकुरे

ओल्या मातीत

मातीत ……..

थेंब मृगाचे

सांडले मोती

तासात ……….

 

काळ्या ढगांची

गर्दी ……….

बातमी गेली

राणात ……….

 

सुटले नभीचे

वादळ ………

थेंब टपोरे

पडतात ……..

 

मोहरली काया

शहारून रोमात ….

थंड हवेचा जोर

शिरशिरी अंगात

……..

 

झाले मोकळे

आकाश ……..

ओसरला जोर

सावकाश ……..

 

पक्षी भिजले

किलबिलाट …….

मोर नाचला

वनी घनदाट ……

 

सांडल्या मृगधारा

मनामनात ……..

मृगाचा खेळ सारा

ठेवा ध्यानात ……..

________________

मनोहर पवार

केळवदकर .

9850812651.

प्रतिक्रिया व्यक्त करा