*चिपी चिपी चुडू चिपी*
चवलीची कोंबडी रुपयाचो मसालो!
मुंबय तो वेंगुर्ला प्रवास माझो पैलो!धृ!
सात वाजता घरातसून भायर म्या पडलंय!
इमानतळाच्या रस्त्यात दोन तास अडलय!
चवलीची कोंबडी रुपयाचो मसालो!
मुंबय तो वेंगुर्ला प्रवास माझो पैलो!१!
दोन तास मगे चेकिंग करण्यात गेले!
सामानात गावला चायची बुकी
बटर आणि पेले!
चवलीची कोंबडी रुपयाचो मसालो!
मुंबय तो वेंगुर्ला प्रवास माझो पैलो!२!
साडे अकाराक इमानाक पयलो पाय लावलय!
जसा काय आर्मस्ट्रोगा बरोबर
चंद्रावर पयलो झेंडो रोवलय!
हडकुळया हावाई सुंदरीन निराशाच केल्यान!
तरी पण बायलेन डोळे वटारून बघल्यानं!
चवलीची कोंबडी रुपयाचो मसालो!
मुंबय तो वेंगुर्ला प्रवास माझो पैलो!३!
इमनातल्या नाश्त्याक ना चव ना ढव!
चाय पण तशीच, फिकी नि बेचव!
खाणा कमी नि कागदच जास्त!
दिवा पॅसेंजरची भेळ कितीतरी मस्त!
चवलीची कोंबडी रुपयाचो मसालो!
मुंबय तो वेंगुर्ला प्रवास माझो पैलो!५!
बसतय तवसर उठुचा इला!
आकाशातून घर गावचा बघूचाच रवला!
पट्ट्यावरची बॅग दिससर जीव अरधो गेलो!
चवलीची कोंबडी रुपयाचो मसालो!
मुंबय तो वेंगुर्ला प्रवास माझो पैलो!६!
इमानान ईलय मगे ,
रिक्षान डबल भाडा
घेतल्यानं
खड्डे सगळे मोजीत मोजीत
वेंगुर्ला एकदाचा गाठल्यानं!
खुळ्यात काढून माका
फुकटचा लेक्चर पण दिल्यानं!
चवलीची कोंबडी रुपयाचो मसालो!
मुंबय तो वेंगुर्ला प्रवास माझो पैलो!७!
मुंबय ता चिपी इमाना सुरू झाली खरी!
पण वेळ आणि पैसो वाट लागता पुरी!
एकाच खेपेत हौस झाली पुरी!
त्या पावस आपली दिवा सावंतवाडीचं बरी!!!
*संग्रह#अजित नाडकर्णी, शुभांजीत श्रृष्टी*
______________________________
*संवाद मीडिया*
👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕
*प्रवेश सुरू….प्रवेश सुरू….प्रवेश सुरू…….*
*शिक्षणासोबत नोकरीची हमी* *फक्त*!!!!
*👉दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,*👩⚕👩⚕
*शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता….(ऍडमिशन) प्रवेश* *सुरु आहे*.
https://sanwadmedia.com/137740/
*दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,* रत्नागिरी येथे १२ वी उत्तीर्ण रत्नागिरीतील विद्यार्थी/ विद्यार्थिनींना प्रवेश घेण्याकरिता सुवर्ण संधी.
खालील अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु.
*▪️B.Sc Nursing*
*▪️Post Basic B.Sc Nursing*
*▪️M.Sc Nursing*
*▪️GNM*
*▪️ANM*
_अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नामांकित हॉस्पिटल मध्ये १००% नोकरीची हमी, तसेच परदेशात सुद्धा काम करण्याची सुवर्ण संधी._
_राज्य सरकारच्या नियमानुसार शिष्यवृत्तीची सोय उपलब्ध तसेच मर्यादित विद्यार्थ्यांना खाजगी संस्था कडून शिष्यवृत्ती चा लाभ._
_प्रवेश निश्चित करण्याकरिता खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा._
*📲८६००३०२४५४*
*📲९४२३२९१८६३*
*📲८८३०७८९५७०*
*प्रवेशासाठी अधिक माहितीकरिता खालील लिंक क्लिक करून आपली माहिती सादर करा.*
https://forms.gle/4i3u6hNgVriV7Msr7
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*