उपरकर समर्थक 4 जुलै रोजी विविध समस्यांबाबत उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची घेणार भेट…
तोडगा न निघाल्यास 15 जुलै रोजी आंदोलन छेडणार..
सावंतवाडी
येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग येथे विविध मागण्यांसाठी माजी आमदार उपरकर यांच्या नेतृत्वाखाली चार रोजी विविध समस्यांबाबत अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. त्यात जर तोडगा न निघाल्यास १५ जुलै रोजी आंदोलन छेडणार येणार आहे, असा इशारा उपरकर समर्थक यांनी सिंधुदुर्ग उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री नंदकिशोर काळे यांची भेट घेत दिला आहे.
याबाबत दिलेल्या पत्रकात ते म्हणाले की परिवहन विभागाकडून लक्झरी होत असलेले ओवरलोड सामान वाहतूक त्याचप्रमाणे प्रवासी वाहतूक होणारी विनापरवाना विना जीएसटी तसेच बिल नसलेल्या सामानाची वाहतूक करण्याबाबत अजूनही कारवाई केलेली नाही काही बसचे ड्राइवर विदाऊट बॅच परप्रांती असल्याबाबत व ड्राइवर दारू किंवा गांजा ओढून गाडी चालवत असल्याबाबत रात्रीची तपासणी केली जात नाही प्रवासी वाहतूक गाड्यांना विमा नसतो पासिंग नसते अशा गाड्या मुंबई गोवा रोडवर प्रवासी वाहतूक करतात त्यांच्यावर कारवाई केली जात नाही तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 च्या ठेकेदाराकडून वाहतूक कायद्याअंतर्गत येणारे साईन बोर्ड तसेच रस्त्यावर हेल्पलाइन बोर्ड त्यावर ठेकेदाराच्या ॲम्बुलन्स किंवा क्रेन पुरविण्याकरिता जवळपासच्या पोलीस स्टेशन चा नंबर हॉस्पिटल चा नंबर अपातकालीनचा बोर्ड लावून या रस्त्याच्या कडेला पाणी तुंबून माती चिखल होऊन रस्त्याच्या कडेला गाड्यांचे टायर रुतले जातात स्पीड लिमिट बोर्ड वळणाचे बोर्ड वागदे येथील धोकादायक वळण किंवा स्पीड स्लो करण्याकरिता कणकवली ब्रिजवर लागले गेले नाहीत हे गेले दोन वर्ष कार्यालयात आम्ही सांगत आहोत तसेच गोवा कर्नाटक राज्यात तसेच आंबोली घाटातून जाणाऱ्या अवजड चिरे वाळू व इतर वाहतुकीवर कारवाई केली जात नाही याबाबत आपल्या कार्यालयाकडे वारंवार सूचना करूनही कार्यालयाने तात्पुरती कारवाई केल्याचा दिखाऊपणा केला असून कडक कारवाई करण्यात आलेली नाही यापूर्वी मागील बैठकीत मांडलेले मुद्दे कमिशनर व आपल्या कार्यालयाने दिलेल्या तक्रारीतील मुद्दे याबाबत चर्चा करण्यासाठी दिनांक 4 जुलै रोजी शिष्टमंडळ सहित भेट घेणार असून ह्या भेटी अंति प्रश्न न सुटल्यास 15 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या कार्यालया वरती कार्यकर्ते व नागरिकांना घेऊन आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी आमदार उपरकर समर्थक आशिष सुभेदार सिंधुदुर्ग ड्रायव्हर असोसिएशन अध्यक्ष विजय जांभळे आप्पा मांजरेकर गिरगोल दिया रघुनाथ खोटलेकर आबा चिपकर अभिजीत पेडणेकर मनोज धुमाळे संदेश सावंत मनोज कांबळी आदी उपस्थित होते.