*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*भरली शाळा*
(पादाकुलक वृत्त)
पाठीवरती दफ्तर ओझे
आनंद तरी मनी खेळतो
हाती घेता हात मैत्रिचा
कंटाळा मग क्षणात पळतो
लाल कुणाचे निळसर पिवळे
दफ्तर आहे दिसत आगळे
गणवेशाचा रंग सारखा
कुणी न वाटे वेगवेगळे
भरली पाटी आणि पुस्तके
हाती पिशवी खाऊ पाणी
हासत खेळत जमुनी जाता
खुशीत येती मुखात गाणी
सरसर पाउल चालत होते
लगबग शाळा कधी गाठतो
पहिल्या रांगेमध्ये बैठक
हक्काचा तो बाक वाटतो
मैदानावर जमला मेळा
घंटा झाली भरली शाळा
निरोप देती आई बाबा
लक्ष देउनी शिक तू बाळा
©दीपक पटेकर (दीपी)
सावंतवाडी
८४४६७४३१९६