You are currently viewing साने गुरुजी कथामाला मालवणच्या कथाकथन स्पर्धेचे विषय जाहीर.

साने गुरुजी कथामाला मालवणच्या कथाकथन स्पर्धेचे विषय जाहीर.

*साने गुरुजी कथामाला मालवणच्या कथाकथन स्पर्धेचे विषय जाहीर.*

*श्यामची आई, समाज सुधारक, अंधश्रद्धा निर्मूलन करताना प्राधान्य!*

साने गुरुजी कथामाला मालवण आणि बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आचरे मालवण तालुक्यात प्रतिवर्षी शाळास्तर, केंद्रस्तर, आणि तालुकास्तर भव्य कथाकथन स्पर्धा आयोजित करते. यावर्षी स्पर्धाचे विषय जाहीर झाले असून अंतिम कथाकथन स्पर्धा 20 नोव्हेंबर 2024 रोजी प.पूज्य प्रकाशभाई मोहाडीकर कथानगरी आचरे येथे होणार आहे.
कथांचे विषय पुढीलप्रमाणे –

🎤 *१) गट अ – इयत्ता ३री,४थी -*
*कथा प्रकार* – जीवन कथा
*कथा विश्लेषण* – साने गुरुजींचे जीवन प्रसंग निवेदक स्वतः सांगत आहे.
*किमान ते कमाल वेळ* – ३ ते ४ मिनिटे
🎤 *२) गट ब – इयत्ता ५वी,६वी -*
*कथा प्रकार* – चरित्र प्रसंग कथा
*कथा विश्लेषण* – दहा पैकी एका समाजसुधारकांच्या जीवनकार्यातील प्रसंग कथा
*किमान ते कमाल वेळ* – ४ ते ५ मिनिटे
🎤 *३) गट क – इयत्ता ७वी,८वी -*
*कथा प्रकार* – संस्कार कथा
*कथा विश्लेषण* – अंधश्रद्धा निर्मूलन – ज्या कथेचे तात्पर्य अंधश्रद्धा निर्मूलन करणारे असेल अशी कथा.
*किमान ते कमाल वेळ* – ५ ते ६ मिनिटे.
…..
✒️ *कथा विषयांसंबंधी मार्गदर्शक टीप*
🌹 *गट अ-* जीवन कथा – साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकातील ४२ रात्रींपैकी कोणतीही एक रात्र निवेदकाने स्वतः कथनीय करून सांगायची आहे. जशीच्या तशी नको ती त्या वेळेत बसविणे.
🌹 *गट ब-* चरित्र प्रसंग कथा -१) प.पू आप्पासाहेब पटवर्धन, २) नरेंद्र दाभोलकर, ३) डॉ अभय बंग, ४) डॉ .राणी बंग, ५) डॉ. प्रकाश आमटे, ६) डॉ. मंदाकिनी आमटे, ७) सिंधुताई सकपाळ, ८) समाजसेवक विनायक दामोदर सावरकर, ९) अण्णाभाऊ साठे, १०) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे या दहा समाज सुधारकांपैकी एका समाजसुधारकांच्या जीवन कार्यातील प्रसंग कथा.
🌹 *गट क-* संस्कार कथा – अंधश्रद्धा निर्मूलन – ज्या कथेचे तात्पर्य अंधश्रद्धा निर्मूलन करणारे असेल अशी कथा; त्यातून लोकांचे प्रबोधन होईल.

टीप – वरील तिन्ही गटातील कथा आपणास तयार मिळणार नाहीत. शोध घेऊन त्या कथेवर कथनीय संस्कार करून वेळेचे नियोजन पाळून कथा तयार कराव्याच लागतील.
✒️ कथा विषयांसंबंधी यापेक्षा अधिक माहिती हवी असल्यास रामचंद्र एकनाथ कुबल ( 9420210811) तसेच सुगंधा केदार गुरव ( 9420078519) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मालवण तालुका कथामालेचे कार्यवाह सुगंधा केदार गुरव यांनी केले आहे.
मालवण तालुका कथामालेची सभा नुकतीच सुरेंद्र सकपाळ, उपाध्यक्ष साने गुरुजी कथामाला मालवण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी वरील विषय जाहीर करण्यात आले.
सदर सभेला रामचंद्र कुबल, परशुराम गुरव, सायली परब, संजय परब, कामिनी ढेकणे, अमृता मांजरेकर, भवन मांजरेकर, मनाली फाटक आणि मार्गदर्शक म्हणून सुरेश ठाकूर ऊपस्थितीत होते.

———————————————

*संवाद मीडिया* जाहिरात 

👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓

*प्रवेश सुरू….. प्रवेश सुरू….. प्रवेश सुरू…..*

*गेली 18 वर्षे 100% देशात आणि परदेशात नोकरी व हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचा अनुभव असलेल्या कोकणातील एकमेव महाविद्यालयात करियर करण्याची सुवर्णसंधी*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ आय.टी ,मीडिया अँन्ड हॉटेल मॅनेजमेंट , दापोली.*
संलग्न मुंबई विद्यापीठ,मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त

*🧑🏻‍🎓👨🏻‍🎓शै. वर्ष 2024-25 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू👨🏻‍🎓🧑🏻‍🎓*

*👉हॉटेल मॅनेजमेंट (B.Sc.Hospitality Studies)*
प्रवेश पात्रता – 12 वी उत्तीर्ण ( कोणतीही शाखा )
कालावधी – 3 वर्षे

*आजच आपला प्रवेश निश्चित करा.*
*📚 वैशिष्टये 📚*

🔹 १०० % प्लेसमेंट.
▪️परदेशात नोकरीच्या संधी.
▪️ ५ स्टार हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण.
▪️ संस्थेतील अनेक विदयार्थी परदेशी कार्यरत.
▪️ अनुभवी अध्यापक वर्ग.

*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(शासन नियमानुसार).*

*पत्ता – भगवान महवीर विद्यासंकुल,श्रीफळ वूड्स,प्रांत ऑफिस जवळ,ता.दापोली , जि. रत्नागिरी*

*📱संपर्क क्रमांक :*

*7057421082*
*9028466701*
*9420156771*

✉️ramraje_r@rediffmail.com
*कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.*

———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा