You are currently viewing देवगड तालुक्यात वादळी वाऱ्याने सुमारे एक लाख दहा हजाराचे नुकसान…

देवगड तालुक्यात वादळी वाऱ्याने सुमारे एक लाख दहा हजाराचे नुकसान…

देवगड तालुक्यात वादळी वाऱ्याने सुमारे एक लाख दहा हजाराचे नुकसान…

वादळाचा जास्त फटका मूळबांध वाडा गावालामणचे येथे डोंगराचा दगड पडला घरावर

देवगड

देवगड तालुक्यात गुरूवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे घरांची पडझड होऊन सुमारे एक लाख दहा हजाराचे नुकसान झाले आहे.या पडझडीचा जास्त फटका वाडा मुळबांध व मणचे गावाला बसला आहे.

देवगड तालुक्यात पावसाची संततधार सुरूच असून वादळी वाऱ्यासह मुसळधार झालेल्या पावसामुळे वाडा मुळबांध येथील माधुरी महेंद्र मांजरेकर यांच्या घराची पडवी कोसळून सुमारे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तेथीलच कल्याण दत्तात्रय जाधव यांच्या घराची संरक्षक भिंत कोसळून १६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तर मणचे देऊळवाडी येथील विजय विठोबा अनमने यांच्या राहते घरावर गुरुवारी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास डोंगरातील दगड कोसळून सुमारे ७१ हजार ४४० रुपयांचे नुकसान झाले आहे. घटना घडतात या घरातील व्यक्तींना बाजूच्या घरात स्थलांतरित करण्यात आले. तर हिंदळे येथील दत्तात्रय कुलकर्णी यांच्या घराच्या पडवीवर सुपारीची ५ झाडे पडून सुमारे ७ हजाराचे नुकसान झाले आहे. असे एकूण मिळून १ लाख ९ हजार ४४० रुपयाचे नुकसान झाले आहे. देवगड तालुक्यात पावसाची संततधार सुरू असून वादळी वाऱ्यामुळे बहुतांश ठिकाणी झाडांच्या फांद्या पडून तसेच वीज पुरवठा खंडित होऊन ठिकठिकाणी किरकोळ नुकसान व पडझड झाल्याचे दिसत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा