You are currently viewing निगुडे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याकडे काम सुरू…

निगुडे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याकडे काम सुरू…

निगुडे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याकडे काम सुरू…

माजी सरपंच समीर गावडे यांच्या प्रयत्नांना यश; ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त..

बांदा

निगुडे येथील तिलारी कालव्यावरून स्मशानभूमी कडे जाणारा रस्ता चिखलमय झाला होता. रस्त्यावरून स्मशानभूमीकडे जाण्यासाठी लाकूड सामान, मृतदेह नेताना पायी चालणे कठीण झाले होते. निगुडे माजी सरपंच समीर गावडे यांच्याकडे ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. या संदर्भात सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प तिलारी कार्यकारी अभियंता श्री. विनायक जाधव यांना दिनांक १८ जून रोजी समीर गावडे यांनी लेखी पत्र दिले होते, की रस्त्याचे काम २७ जून पूर्वी सुरू करा तसे न झाल्यास उपोषण करण्याचा दिला होता इशारा. त्याची दखल घेऊन कालपासून त्या ठिकाणी दगड व खडी ओतण्याचे काम सुरू झाले आहे. कार्यकारी अभियंता श्री. विनायक जाधव यांच्या लेखी आश्वासन अंती समीर गावडे यांनी आजचे उपोषण मागे घेतले आहे.

रस्ता लवकरात लवकर पूर्ण करु व त्याचे काम पूर्ण करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला देण्यात आलेले आहेत. तरी आपण आजचे आपले उपोषण स्थगित करून आम्हास सहकार्य करावे. असे लेखी पपत्र श्री. जाधव दिलेले आहे त्यामुळे अखेर आज त्यांनी आपले उपोषण मागे घेतले जाग्यावर मटेरियल आणुन ठेवलेले आहे. पाऊस खूप असल्याने खडी पसरता येत नाही पाऊस थोडा कमी झाला की रस्ताचे काम पूर्ण करण्यात येईल. असेही कार्यकारी अभियंता श्री विनायक जाधव यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा