You are currently viewing आंबोलीत दुचाकी घसरून झालेल्या अपघातात आजरा येथील युवक ठार…

आंबोलीत दुचाकी घसरून झालेल्या अपघातात आजरा येथील युवक ठार…

आंबोलीत दुचाकी घसरून झालेल्या अपघातात आजरा येथील युवक ठार…

दोघे मित्र गंभीर जखमी; वर्षा पर्यटनासाठी येत असताना घडला अपघात…

आंबोली

वर्षा पर्यटनासाठी येत असताना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दगडाला डोके आदळल्यामुळे आजरा येथील युवक आदित्य भिकाजी कोरवी ( वय १९ ) हा जागीच ठार झाला, तर त्याचे अन्य दोघे मित्र गंभीर जखमी झाले. ही घटना आज सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आजरा फाटा येथे घडली. ओंकार कारेकर आणि वेदांत कोंडुस्कर अशी जखमींची नावे आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी रुग्णालयात हलिवण्यात आले आहे. याबाबत आंबोली पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आदित्य हा आजरा महाविद्यालयात बी.ए प्रथम वर्षामध्ये शिकत होता, तसेच तो एका ठिकाणी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. त्याच्या पश्चात आई व छोटी बहीण असा परिवार आहे. दरम्यान अपघात झाल्याचे कळताच आंबोली पोलीस कॉन्स्टेबल दीपक शिंदे व मनीष शिंदे हे घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी मृतदेह येथील स्थानिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा