You are currently viewing कुडाळ येथे “महेंद्रा अकॅडमीचे” एकनाथ पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

कुडाळ येथे “महेंद्रा अकॅडमीचे” एकनाथ पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

*सावंतवाडी संस्थांनचे युवराज लखमराजे भोसले, युवराज्ञी श्रद्धाराणी भोसले यांची प्रमुख उपस्थिती*

 

 

कुडाळ :

 

कुडाळ येथे नव्याने सुरू झालेल्या “महेंद्रा अकॅडमी” शाखेचा शुभारंभ “तात्यांचा ठोकळा” या पुस्तकाचे लेखक एकनाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सावंतवाडी संस्थांनचे युवराज लखमराजे भोसले, युवराज्ञी श्रद्धाराणी भोसले, अभिनेते विवेक वाळके, प्रशासकीय अधिकारी सचिन गोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी अकॅडमीचे संचालक महेंद्र पेडणेकर यांनी संस्थेच्या माध्यमातून कोकणात विद्यार्थी घडविण्याचे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर कोकणात अशा प्रकारची संस्था सुरू करून त्या माध्यमातून विद्यार्थी घडवण्याची काम करणाऱ्या महेंद्रा अकॅडमी चे कार्य कौतुकास्पद आहे. आपण त्यांना लागणारी मदत निश्चितच करू असा विश्वास श्री एकनाथ पाटील यांनी व्यक्त केला. तर युवराज लखमराजे भोसले यांनी ‘महेंद्रा अकॅडमी’ चा प्रवास सावंतवाडीतून सुरू झाला आणि आज कुडाळ पर्यंत येऊन पोहोचला आहे. या अकॅडमीच्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थी घडावेत आणि कोकणचे नाव उंच व्हावे अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा