You are currently viewing महायुतीसाठी कोकण पदवीधरची निवडणूक एकतर्फी- आ.नितेश राणे

महायुतीसाठी कोकण पदवीधरची निवडणूक एकतर्फी- आ.नितेश राणे

महायुतीसाठी कोकण पदवीधरची निवडणूक एकतर्फी- आ.नितेश राणे

*आमदार नितेश राणे यांनी रांगेत उभे राहत बजावला मतदानाचा हक्क

*कणकवली मतदान केंद्रावर मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली
कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदाराला सुरुवात झाली. आमदार नितेश राणे यांनी सकाळच्या सत्रामध्ये रांगेत उभे राहून आपल्या मतदानाचा हक्क कणकवली प्रांत कार्यालय येथील मतदान केंद्रावर बजावला.
यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले,कोकण पदवीधर मतदार संघातील आज होत असलेली निवडणूक ही महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्यासाठी एकतर्फी आहे. विरोधी उमेदवार अथवा महाविकास आघाडीचे नेते प्रचारासाठी या जिल्ह्यांमध्ये आलेले दिसले नाहीत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे ठाण्यात एक सभा घेताना दिसले त्या व्यतिरिक्त त्यांच्या स्वतःच्या पक्षाचा उमेदवार असतानाही ते रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये दिसले ही नाहीत. स्वतःच्या पक्षाच्या उमेदवारासाठी जे पक्ष व त्यांचे प्रतिनिधी या जिल्ह्यांमध्ये येऊ शकत नाहीत ते या मतदारसंघाचा आणि मतदारांचा विकास करू शकतात का? म्हणूनच ही निवडणूक एकतर्फी आहे, अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केली. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी येथे मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना श्री राणे म्हणाले, आमचे महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवून त्यांना श्री. डावखरे यांचा जाहीरनामा दिलेला आहे. निवडणुकीच्या कालावधीत ज्या पक्षाचे उमेदवार व नेते जिल्ह्यात येत नाहीत ते निवडणुकीनंतर येणार का ? याचा विचार पदवीधर मतदारांनी करावा असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा