*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी लेखक संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम लेख*
*थोड मनातलं*
***************
*कब तक ईमानदार बनके रहोंगे*
*ये बेईमान लोग तुम्हे जिने नहीं लेंगे*
****************************
*कधी कधी या ओळी वाचतो ना तर यातली सत्यता अस्वस्थ करते किती खारेपणा आहे या ओळींमध्ये. खरचं प्रामाणिक राहून माणसाने कधीच जगू नये.कारण खोटया माणसांच्या गर्दीत सत्याची वाट सपडतचं नाही. सगळीकडे खोटी लबाड बदमाश धुर्त माणसं दिसतात म्हणून सत्याच्या मार्गावर चालणारा खरा माणूस मागे पडतो.खरतर जी माणसं प्रामाणिक साधी सरळ असतात सुस्वभावी असतात अशा माणसाला मतलबी माणसा कडून खुप जास्त त्रास सहन करावा लागतो.कोणीही कांहीही बोलून घेतो कोण केव्हा फसवेल यांचा काही भरोसा नसतो.पण प्रामाणिक माणसाला जगायचं असतं म्हणून खऱ्या माणसाला अन्याय अत्याचार स्विकारताना जगण्याच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकावे लागते.ईथे लबाडांचा उदोउदो होते तर खोट्यां माणसांची डोक्यावर मिरवणूक काढतात.पण बेईमानीला मर्यादा असतात प्रामाणिकपणा अमर्यादित असतो. खोट्या माणसांना स्वतःचीच भिती वाटते तर प्रामाणिक माणसं न घाबरता जगतात.किती फसवणूक करणार कितीदा त्रास देणार.जो हेतूपुरस्सर दुसऱ्याला मुद्दामहून रडवतो ना.त्याचे अश्रू पुसायला त्याचेच स्वतःचे ही हात पुढे होत नाहीत. दुसऱ्याला रडवन सोपं आसत पण जेव्हा स्वतःवर रडण्याची वेळ येते ना तेव्हा कळतं त्रासाच्या वेदना किती भयानक असता.म्हणून खऱ्या माणसाला खोट्या माणसा सारख जगता येत नसलं तरी दुसऱ्याला त्रस्त देण्याची तळमळ त्याला सलत नसते.खरा माणूस दिवसभर प्रामाणिकपणे काम करून आपल्या परिवारासोबत सुखाने राहतो आणि रात्री डाराडूर झोपतो.कारणं समाधान हेच खऱ्या माणसाची जमा पुंज असते म्हणून खऱ्याचा नाद करायचा नाही.खऱ्या माणसाची सहनशीलता ज्या दिवशी संपते त्या दिवशी खोट्या माणसाला पळता भुई थोडी होते लक्षात ठेवा.*
*संजय धनगव्हाळ*
*(अर्थात कुसुमाई)*
९४२२८९२६१८
९५७९११३५४७