You are currently viewing फिट येऊन पडलेल्या युवकाचे उपचारादरम्यान निधन…

फिट येऊन पडलेल्या युवकाचे उपचारादरम्यान निधन…

फिट येऊन पडलेल्या युवकाचे उपचारादरम्यान निधन…

बांदा

मुंबई-गोवा महामार्गावर फिट येऊन पडलेल्या युवकाचे उपचारादरम्यान निधन झाले. आपा भीमसेन चव्हाण (वय ३८, बांदा-देऊळवाडी) असे त्याचे नाव आहे. ही घटना काल सायंकाळी घडली. याबाबत बांदा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई-गोवा महामार्गावर फिट येऊन आपा चव्हाण हा पडला. त्याला तात्काळ उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतानाच अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्याचे निधन झाले.त्याच्या पश्चात आई, दोन भाऊ, तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा