पदवीधर मतदार संघाचे उमेदवार निरंजन डावखरे यांना मोठे मतांधिक्य देऊ
शिवसेना दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांना विश्वास, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे केले आवाहन*
दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्यात मोठ्या प्रमाणात पदवीधर हे महायुतीच्या पाठीशी आहेत. त्यामुळे कोकण पदवीधर मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांना दोडामार्ग तालुक्यातून मोठे मताधिक्य देऊ असा विश्वास शिवसेना दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी व्यक्त केला. ते दोडामार्ग येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते.
यावेळी त्यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दोडामार्ग तालुक्यातील प्रत्येक पदवीधर मतदारापर्यंत पोहचून निरंजन डावखरे यांच्या माध्यमातून पदवीधर तसेच शिक्षक व इतर घटकांसाठी झालेल्या कार्याची माहिती द्या आणि तालुक्यातून मोठे मताधिक्य देण्यासाठी तयार रहा आणि निरंजन डावखरे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन यावेळी केले. तसेच महायुती व स्थानिक आमदार मंत्री दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनातून व माध्यमातून जी तालुक्यात विकास कामे सुरू आहेत याबाबत आढावा व चर्चा ही पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आली.
यावेळी गणेश प्रसाद गवस यांसह दादा देसाई, मायकल लोबो, भगवान गवस, रामदास मेस्त्री, सौ. चेतना गडेकर, सौ.सानवी गवस, दादा पालयेकर गुरुदास सावंत, योगेश महाले,अनिल शेटकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.