You are currently viewing खासदार सुरेश प्रभू शनिवारपासून सिंधुदुर्ग-रत्नागिरी दौऱ्यावर.!

खासदार सुरेश प्रभू शनिवारपासून सिंधुदुर्ग-रत्नागिरी दौऱ्यावर.!

सिंधुदुर्ग

माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार सुरेश प्रभू शनिवार दि. २ जानेवारीपासून सिंधुदुर्ग-रत्नागिरीच्या सहा दिवशीय दौऱ्यावर आहेत. या सहा दिवशीय दौऱ्यात सिंधुदुर्गातील विविध संस्थाना भेटी देऊन, शासकीय योजनांची जिल्ह्यातील कार्यवाही याबाबत माहिती घेवून शेतकरी, मच्छिमार बांधव यांच्याशी संवाद साधतील. या दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातील पत्रकारांशी ते चर्चा करणार आहेत.

खासदार सुरेश प्रभू यांचा दौरा असा असेल :

२ जानेवारी : गोव्याहून प्रयाण. सायंकाळी ५.३० वा. सावंतवाडीतील आर.एस.एस. कार्यालयास भेट देतील. यावेळी सहकारभारती, विद्याभारती, जनकल्याण समिती, हेडगेवार प्रकल्प, किसान संघ, भारतीय मजदूर संघ, अधिवक्ता परिषद, संस्कृत भारती या संस्था प्रतिनिधींची भेट घेतील. ६.२० वा. सावंतवाडी नगरपालिकेस भेट देऊन पत्रकारांशी चर्चा करतील. ७.३५ वा. पिंगुळी येथील सुंदर मेस्त्री यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यानंतर रात्री ८.०५ वा. कुडाळ इथं संजय पडते यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतील.

३ जानेवारी : सकाळी ९.१५ वा. मालवणकडून प्रयाण करतील. १०.०० वा. अणाव इथं मानव संसाधन विकास संस्था संचलित स्कूल ऑफ नर्सिंगच्या इमारत भूमिपूजन व कोनशीला कार्यक्रमास उपस्थित राहतील. ११ वा. अणाव इथच जनशिक्षण संस्थान व एएआय यांच्या संयुक्त सायकल व शिवणयंंत्र प्रदान कार्यक्रमास उपस्थित राहतील. १२.०० वा. अणाव इथं पत्रकार परिषद होईल. १२.२५ वा. ओरोस येथील जनशिक्षणच्या नूतन इमारतीस भेट, १२.४० वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग इथ प्रधानमंत्री योजना व केंद्रशासित योजनांची आढावा बैठक होईल. २.०० वा. कसाल येथील पडवे एस.एस.पी.एम. वैद्यकीय महाविद्यालयास भेट देतील. ३.३० वा. कुडाळ येथील मराठा समाज हॉलमध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीबाबत नाबार्ड आणि लुपिन फाउंडेशनच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून नाबार्ड स्थापित शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालकांना मार्गदर्शन करतील. ४.०० वा. कुडाळ भाजपा कार्यालयास भेट देऊन विकासकामाबाबत चर्चा होईल. ४.३० वा. कुडाळ येथील बांबूला जागतिक पातळीवर पोहोचविणाऱ्या कॉनबकला भेट देवून ५.०० वा. कोकण क्रीडा प्रबोधिनीच्या क्रीडासंकुल जागेची पाहणी करतील.

४ जानेवारी : सकाळी १०.१५ वा. मालवणवरून प्रयाण. ११.३० वा. कणकवली भाजपा कार्यालयास भेट देऊन केंद्र सरकारचे रोजगारविषयक धोरण, विविध विधेयके याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. १२.१५ वा. फोंडा इथं कै. सुदन बांदिवडेकर यांच्या निवासस्थानी भेट देतील. १.१५ वा. खारेपाटण रेल्वेस्थानकाची पाहणी करून तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. त्यानंतर रत्नागिरीस प्रयाण करून दि. ५ जानेवारीला त्यांचा रत्नागिरीत दौरा असेल.

६ जानेवारी : सकाळी १०.३० वा. मसुरे इथं शेतकरी बांधवांची भेट घेवून त्यांच्याशी संवाद साधतील. १२ वा. मालवणमधील विविध संस्था प्रमुखांशी चर्चा, ३.३० वा. नवीन शैक्षणिक धोरणाशी चर्चा, ४ वा. मालवण येथील मच्छिमार बांधवांशी चर्चा आणि ४.४५ वा. इथंच विविध प्रश्नांबाबत स्थानिक जनतेसोबत चर्चा करतील.

७ जानेवारी : सकाळी १० वा. मालवणकडून प्रयाण, १०.३० वा. नागरी उड्डाणमंत्री असताना चालना दिलेल्या चिपी विमानतळास भेट, १२.०० वा. आरवलीतील वेतोबा दर्शन घेवून १२.२० वा. शिरोडा येथील स्थानिक नेते आणि मच्छिमार बांधवांशी चर्चा करून १ वा. गोव्याकडे प्रयाण करतील.

प्रतिक्रिया व्यक्त करा