ख्रिस्ती बांधवांना अर्चना घारेंकडून सांज्यावच्या शुभेच्छा.
सावंतवाडी :
चराठा-कोसेसाववाडी येथील ख्रिश्चन बांधवांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ.अर्चना घारे परब यांनी सांज्याव सणाच्या शुभेच्छा दिल्या. ख्रिस्ती बांधवांसाठी हा सण आनंदाची पर्वणीच असतो. संत जॉन बाप्तिस्त यांचा जन्मदिवस ‘सांज्याव’ म्हणून साजरा केला जातो.
तालुक्यातील ख्रिस्तीबांधवांनी सांज्याव सण मोठ्या उत्साहात साजरा केला. संत जॉन बाप्तिस्त यांचा जन्मदिवस ‘सांज्याव’ म्हणून साजरा केला जातो. बायबलमधील कथेनुसार जीजसच्या जन्माची बातमी ऐकल्यानंतर आपल्या आईच्या पोटात असलेल्या जॉन बाप्तिस्त यांनी आनंदाने उडी मारली होती. त्यामुळे विहिरीत उडी घेऊन आनंदोत्सव साजरा करण्याचा प्रघात ख्रिस्ती धर्मात आहे. धो-धो पावसामध्ये डोक्यावर रंगीत फुलांचे मुकुट घालून हातामध्ये माडाचे पिडे व वाद्यांचा गजर करीत ख्रिस्तीबांधव या दिवशी गटागटाने फिरत असतात. मौजमस्ती करीत कोकणी गाणी, कातारा गात, घुमट वाजवत सर्वजण आनंदाने नाचतात.
तालुक्यातील चराठा येथील कोसेसाववाडीमधील ख्रिस्ती बांधवांनी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे परब यांनी यांनी उपस्थित राहत ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा देत आनंदोत्सवात सहभागी झाल्या. यानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. यावेळी पिटर फर्नांडिस, डॉ. आगस्तीन डिसोझा, सुजाता फर्नांडिस, नोबेर्ट माडतिस, फॅलेक्स फर्नांडिस, आर्कजन डिसोझा आदी ख्रिस्ती बांधव भगिनी उपस्थित होत्या.
*संवाद मीडिया*
👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕
*प्रवेश सुरू….प्रवेश सुरू….प्रवेश सुरू…….*
*शिक्षणासोबत नोकरीची हमी* *फक्त*!!!!
*👉दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,*👩⚕👩⚕
*शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता….(ऍडमिशन) प्रवेश* *सुरु आहे*.
https://sanwadmedia.com/137740/
*दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,* रत्नागिरी येथे १२ वी उत्तीर्ण रत्नागिरीतील विद्यार्थी/ विद्यार्थिनींना प्रवेश घेण्याकरिता सुवर्ण संधी.
खालील अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु.
*▪️B.Sc Nursing*
*▪️Post Basic B.Sc Nursing*
*▪️M.Sc Nursing*
*▪️GNM*
*▪️ANM*
_अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नामांकित हॉस्पिटल मध्ये १००% नोकरीची हमी, तसेच परदेशात सुद्धा काम करण्याची सुवर्ण संधी._
_राज्य सरकारच्या नियमानुसार शिष्यवृत्तीची सोय उपलब्ध तसेच मर्यादित विद्यार्थ्यांना खाजगी संस्था कडून शिष्यवृत्ती चा लाभ._
_प्रवेश निश्चित करण्याकरिता खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा._
*📲८६००३०२४५४*
*📲९४२३२९१८६३*
*📲८८३०७८९५७०*
*प्रवेशासाठी अधिक माहितीकरिता खालील लिंक क्लिक करून आपली माहिती सादर करा.*
https://forms.gle/4i3u6hNgVriV7Msr7
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/137740/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*