You are currently viewing आला झिम्माड पाऊस

आला झिम्माड पाऊस

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आला झिम्माड पाऊस* 

 

आला झिम्माड पाऊस

वारा खट्याळ वाहतो

सप्त रंगी इंद्र्धनु

निळ्या आभाळी खुलतो

 

सरसर धारासवे

रानी घुमतो पारवा

येता पावसाची सर

मनी स्पर्शतो गारवा

 

चमकताचं बीजली

लाज लाजे वसुंधरा

अवनी मेघांचे मिलन

येती पावसाच्या धारा

 

चिंब सरीत भिजतो

हिरवा गारं हा निसर्ग

खुललेली वसुंधरा

रंभा अप्सरेचा स्वर्ग

 

लता वेली झाडं कुंद

सुमनांच्या कळ्या धुंद

पावसाच्या तालावरं

सरी नाचतात मंद

 

वनराई, आमराई

रानं कुरणे, माळरानं

हिरव्यागार रानामध्ये

विसरलं देहभानं

 

*शीला पाटील. चांदवड.*

प्रतिक्रिया व्यक्त करा