You are currently viewing कोकणचा विकास हाच आमचा ध्यास -निरंजन डावखरे

कोकणचा विकास हाच आमचा ध्यास -निरंजन डावखरे

*कोकणचा विकास हाच आमचा ध्यास -निरंजन डावखरे*

*कोकण पदवीधर मतदार संघाचे उमेदवार आमदार निरंजन डावखरे यांची वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयाला सदिच्छा भेट.*

*कोकणातील प्रत्येक शाळा डिजिटल करण्याचा मानस- निरंजन डावखरे*

कोकणातील प्रत्येक सुशिक्षित हा सक्षम व रोजगार क्षम बनवण्यास आम्ही प्रयत्नशील आहोतच तसेच शैक्षणिक क्षेत्रातील सर्वच प्रश्न मार्गी लावण्यास कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी केले, ते वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,तळेरे येथे बोलत होते.
भाजपा,शिवसेना,राष्ट्रवादी, मनसे, व आर.पी.आय.आणि मित्र पक्षाच्या महायुतीचे उमेदवार आमदार निरंजन डावखरे यांनी कोकण पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने तळेरे हायस्कूलला सदिच्छा भेट दिली.याप्रसंगी तळेरे सरपंच हनुमंत तळेकर यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी भाजप जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत, कणकवली तालुका भाजपा अध्यक्ष संतोष कानडे,उद्योगपती संकेत महाडीक,अनिरुद्ध महाडिक,उद्धव महाडिक उपसरपंच शैलेश सुर्वे,सर्व शाळा समिती सदस्य,प्राचार्य अविनाश मांजरेकर,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा पारी उपस्थित होते.
यावेळी निरंजन डावखरे यांनी प्रशालेची पाहणी करत प्रशालेतील उपक्रमांबद्दल जाणून घेतले.शिक्षकांच्या व्यथा जाणून घेतल्या.त्यांचे सर्वच प्रश्न सोडवण्याची तसेच प्रत्येक शाळा ग्रीन स्कूल करण्याची ग्वाही दिली. दहावी-बारावी मध्ये अव्वल येणारे कोकणवासी एम.पी.एस.सी. व यू.पी.एस.सी. मध्ये मात्र मागे राहत असल्याची खंत व्यक्त करत त्यावरही उपाय म्हणून ई-लायब्ररी देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी प्रशालेतील उपक्रमांबद्दल कौतुक करत प्रशालेला आवश्यक भौतिक वास्तूंची पूर्तता करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. कणकवली तालुका अध्यक्ष संतोष कानडे यांनी केंद्राबरोबरच महाराष्ट्रातही आपली उंची कायम राखण्यासाठी आमदार निरंजन डावखरे यांच्या पाठीशी राहून त्यांना प्रचंड मताधिक्यांनी विजयी करूयात असे आवाहन केले.आमदार महोदयांनी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न जाणून घेऊन योग्य तो न्याय देण्याची ग्वाही दिल्याबद्दल तसेच प्रशालेला सदिच्छा भेट दिल्याबद्दल प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी त्यांना पुढील वाटचालीस यशस्वी शुभेच्छा दिल्या.
प्रशालेच्या सहा.शिक्षिका डी.सी.तळेकर यांनी सर्वांचे आभार मानले.

*संवाद मीडिया*

*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*
https://sanwadmedia.com/137185/

For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच 3 जून पासून सुरू करत आहोत

( *आपले कॉलेज मधील admission निश्चित होई पर्यंत आपण फ्री lecture attend करु शकता. याची फी घेतली जाणार नाही* )
========================
*MHT -CET / JEE guidence*
========================

🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
ऑफिस 9422896719

*Advt Web link*
https://sanwadmedia.com/137185/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा