विधानपरिषदेच्या निवडणुकीत मत नोंदविण्यासाठी महत्वाच्या सूचना
सिंधुदुर्गनगरी
कोकण विभाग मतदारसंघ निवडणूकीकरीता बुधवार 26 जून 2024 रोजी मतदान होणार आहे. या विधानपरिषदांच्या निवडणूकीच्या अनुषंगाने मतदान कसे करावे याबाबत महत्वाच्या मागदर्शक सूचना पुढीलप्रमाणे देण्यात देण्यात आल्या असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे देण्यात आल्या आहेत.
राज्यांच्या विधानपरिषदांच्या निवडणुकीसाठी मत नोंदविण्याबाबत महत्वाच्या सूचना-
अ) मतदानाची कार्यपध्दती- मतदान करण्यासाठी केवळ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतपत्रिकेसोबत पुरविलेला जांभळ्या रंगाचा स्केचपेन वापरावा. याशिवाय मतपत्रिका अवैध ठरेल असं इतर कुठलेही पेन, पेन्सिल, बॉलपॉईन्ट पेन किंवा इतर चिन्हांकित करावयाची साधने वापरू नयेत.
(1) पसंतीक्रम (Order of Preference) या स्तंभामध्ये, ज्यास पहिला पसंतीक्रम देण्यासाठी निवडलं आहे. त्या उमेदवाराच्या नावासमोर ‘1’हा अंक नमूद करुन त्यास मतदान करता येईल. ‘1’ हा अंक केवळ एका उमेदवाराच्या नावासमोर नमूद करता येईल.
(2) जरी निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या एका पेक्षा जास्त असेल तरी “1” हा अंक केवळ एकाच उमेदवाराच्या नावासमोर नमूद करता येईल.
(3) निवडून द्यावयाच्या उमेदवारांच्या संख्येव्यतिरिक्त जेवढे उमेदवार निवडणूक लढवित आहेत. तेवढे पसंतीक्रम नोंदविता येतील. उदा. जर 5 उमेदवार निवडणूक लढवित असतील आणि फक्त 1 उमेदवार निवडून द्यावयाचा असेल तर तुम्ही तुमच्या निवडीप्रमाणे 1 ते 5 पसंतीक्रम देऊ शकता.
(5) उर्वरित उमेदवारांच्या नावासमोर पुढील पसंतीक्रम 2. 3.4 इत्यादी अंक पसंतीक्रमानुसार पसंतीक्रम (Order
of Preference) या स्तंभामध्ये दर्शविता येईल.
(5) कोणत्याही उमेदवारांच्या नावासमोर केवळ एकच अंक नमूद केला जाईल याची खात्री करावी आणि एकसमान अंक एका पेक्षा जास्त उमेदवारांच्या नावा समोर नमुद केले नसल्याची सुद्धा खात्री करावी.
(6) पसंतीक्रम हा केवळ अंकात दर्शविला जाईल. उदा. 1.2.3. इत्यादी आणि तो एक, दोन, तीन, इत्यादी असा शब्दात दर्शविलेला नसेल.
(7) पसंतीक्रम” (Order of Preference) स्तंभामधील अंक हे भारतीय आंतरराष्ट्रीय अंक स्वरुपात जसे १. २. ३ इत्यादी किंवा रोमन स्वरुपातील I.II.III. इत्यादी किंवा देवनागरी स्वरुपातील 1.2.3 किंवा संविधानाच्या 8 व्या अनुसुचीतील भारतीय भाषेतील अंकाच्या स्वरुपात नोंदविला जाईल.
(८) मतपत्रिकेवर मतदारांचे नाव किंवा कोणतेही शब्द, आणि मतदाराची स्वाक्षरी किंवा आद्याक्षरे नमूद करू नयेत, तसेच अंगठ्याचा ठसा सुध्दा उमटवू नये. यामुळे मतपत्रिका अवैध ठरेल.
(९) पसंतीक्रम दर्शविण्यासाठी मतपत्रिकेवर उमेदवाराच्या नावासमोर केवळ ‘ü’ किंवा ‘X’ असे नमूद करणे पुरेसे नाही, अशी मतपत्रिका बाद ठरू शकते. आपला पसंतीक्रम केवळ अंकात १.२.३. इत्यादी वर विषद केल्याप्रमाण नमूद करावा.
(१०) मतपत्रिका वैध ठरण्यासाठी उमेदवारांपैकी एकाच्या नावासमोर १’ हा अंक दर्शविणे आवश्यक आहे. इतर पसंतीक्रम हे ऐच्छिक स्वरुपाचे आहेत. दुसरा आणि त्यापुढील पसंतीक्रम दर्शविणे किंवा न दर्शविणे ही बाब मतदारासाठी ऐच्छिक आहे.
ब) अवैध मतपत्रिका- मतपत्रिका खालील कारणांनी अवैध ठरविण्यात येईल-
१) अंक ‘१’ नमूद नसल्यास.
२) एका पेक्षा जास्त उमेदवारांच्या नावासमोर ‘१’ हा अंक नमूद केलेला असल्यास.
३) ‘१’ हा अंक अशा रितीने नमूद केला आहे का, तो कोणत्या उमेदवारा करिता दिला याबाबत संदिग्धता आहे.
४) ‘१’ हा अंक आणि इतर अंक जसे की, २. ३ इत्यादी एकाच उमेदवाराच्या नावासमोर नमूद केलेले असल्यास.
५) पसंतीक्रम अंका ऐवजी शब्दात नमूद केल्यास,
६) मतदाराची ओळख पटेल असे कोणतेही चिन्ह किंवा लिखान मतपत्रिकेवर नमूद असल्यास,
७) निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने पसंतीक्रम नमूद करण्यासाठी दिलेल्या जांभळ्या स्केच पेन शिवाय इतर वस्तूने कोणताही अंक नमूद केलेला असल्यास.
*संवाद मिडिया*
*Pune’s Largest Chain of Pre- School Now in SAWANTWADI*
👩🏻🏫 *GURU GLOBAL SCHOOL* 👩🏻🏫
🟢 *Admission Open 2024-2025* 🟢
📚 *Syllabus as per CBSE* 📚
🧮प्ले स्कूल: 2-3 वर्ष
🧮नर्सरी: 3-4 वर्ष
🧮ज्युनिअर केजी: 4-5 वर्ष
🧮सिनियर: 5-6 वर्ष
❇️ *आमची विशेषता* ❇️
✅High Qualified Staff
✅100 + pre School across India
✅Award Winning School
✅Unique Teaching Methodology
✅ABACUS & PHONICS
🟪 *After School Programs* 🟪
🧮📚 *ABACUS Makes Your Child Faster & Smarter* 🧮📚
📚Imagination
📚Creativity
📚Photographic Memory
📚Application
📚Observation
📚Self Confidence
📚Judgement
📚Reasoning
📚PHONICS
*🧮📚मग वाट कसली पाहताय आजंच तुमच्या पाल्याला स्मार्ट आणि इंटेलिजन्स करण्यासाठी प्रवेश निश्चित करा 🧮📚*
🔶We Mentor your child *READ* 🔷
🔶 *WRITE* 🔷Accurately and 🔶 *SPEAK*🔷 fluently
🟩 *Call For Admission* 🟩
🟢 *MRS.SARITA PHADNIS*
*📱9922903515*
*📱9420785879*
*📱9172693343*
🛣️ *आमचा पत्ता*
*Shri Datta Krupa Residency Opp UCO Bank, Bhind Fish Market, Sawantwadi, Sindhudurg, Maharashtra*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/131177/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*