आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला प्लास्टिक स्टूल वाटप
बांदा
भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजप युवा मोर्चा सरचिटणीस तथा माजी उपसरपंच बांदा ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब आणि बांदा शहर भाजपाच्या वतीने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी प्लास्टिक स्टूल वाटप करण्यात आले.
बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांना बसण्यासाठी स्टूल उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली होती. त्या अनुषंगाने आज आ. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त या स्टूलचे वितरण बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले.
यावेळी भाजयुमो जिल्हा सरचिटणीस तथा माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, बांदा सरपंच प्रियांका नाईक, वाफोली उपसरपंच विनेश गवस, बांदा ग्रामपंचायत सदस्य देवल येडवे,शामसुंदर मांजरेकर, प्रशांत बांदेकर, आबा धारगळकर, कैलास गवस, माजी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर सावंत,सुधीर शिरसाठ, निलेश उर्फ पापू कदम, गुरु कल्याणकर, स्वप्नील सावंत, गुरुनाथ सावंत, विलास पावसकर,माजी सरपंच दिपक सावंत, सिद्धेश महाजन, अक्षय परब शुभम साळगावकर, प्रविण नाटेकर, शिवनाथ मळवाडकर,अभिजित देऊलकर, वसिम बुराण, बाळा आकेरकर, शैलेश केसरकर, सुनील धामापूरकर, ऋषी सावंत आदी उपस्थित होते.