You are currently viewing असे जाणावे बालमन

असे जाणावे बालमन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*असे जाणावे बालमन* 

 

सुंदर ते ध्यान

सुंदर ते गुण |

सुंदर ते मन

बालमन ||१||

निरागस भाव

प्रेमळ स्वभाव |

अक्षरात देव

शोधतसे ||२||

गोष्टी वाचण्यासी

प्रीत शिक्षकांची

ओढ अक्षरांची |

बालकांसी ||३||

बालबाला भारी

कुणी रेषारंगी

रंगे चित्ररंगी |

बहुतांशी ||४||

बाळकृष्ण शोभे

चतुर चपळ |

भासे अवखळ

राजसतो ||५||

आदर्श वागावे

अहो श्रेष्ठ ज्येष्ठ |

पहा बाळ श्रेष्ठ

अनुसरी ||६||

शिस्त आचरावी

शिकवण्या आधी |

सहज उपाधी

मिळवावी ||७||

 

कवी :- श्री सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे.

फणसखोल, आसोली, ता. :- वेंगुर्ला,

जि :- सिंधुदुर्ग, राज्य :- महाराष्ट्र.

प्रतिक्रिया व्यक्त करा