You are currently viewing मनाचा गाभारा…

मनाचा गाभारा…

*मनस्पर्शी साहित्य परिवार तथा माझी लेखणी साहित्य समूहाच्या सन्माननीय सदस्य कवयित्री अरुणा गर्जे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मनाचा गाभारा…*

 

माझ्या मनाचा गाभारा

रिता कधी ना राहिला

मनाचिया गाभाऱ्यात

पांडुरंग विसावला

 

कटीवरी दोन्ही हात

पीत पितांबर खास

तुळशीच्या त्या माळेचा

कैसा लपेल सुवास

 

रूप दिसे डोळ्यापुढे

तुझे साजिरे गोजिरे

मना लागले रे वेड

तुझ्या ठायी चित्त सारे

 

नाही देखिली पंढरी

नाही केली कधी वारी

दिसे तरी डोळ्यापुढे

तुझी मूर्ती ती साजरी

 

पांडुरंग पांडुरंग

मुखी सदा तुझे नाव

नामामधी भरला रे

किती तरी भक्तीभाव

 

अरे! विठ्ठला विठ्ठला

जरी खेळ तुझा न्यारा

परि कधी नको सोडू

माझ्या मनाचा गाभारा

 

@अरुणा गर्जे

नांदेड

प्रतिक्रिया व्यक्त करा