*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अहिराणी बोलीतील अप्रतिम काव्यरचना*
*देवबा पावसा*
ये रे भो पावसा
यी तरी जाय
एकदावनं आम्हले
गार करी जाय
उन्हायामां शेकाई गवू
म्हसोबाले पुजी उनू
आभायले डोया लाईसन
घाम गाई ऱ्हायनू
प्यावाले पाणी नई
वावरं भी कोल्लं शे
तुन्हा बगेर आम्हनं
जगनं कठीण शे
आथाईन ये तथाईन ये
कथाईन पण ये
रोहिण्या बरस मिरग बरस
पण धो धो ये
यंदाना सालले
वाट दखाले लावू नको
ह्या वाईट दिनमां
तोंडनं पानी पयाडूं नको
तू आम्हले देशी
तव्हयंच आम्ही जगसूं
तव्हयतर दरसालले
तुन्हाच नवस करसूं
देवबा…. पावसा…
एकदावनं यी तरी जाय
आम्हनं घर आंगन शेत
गार करी जाय
कवी:-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*(चांदवडकर ). धुळे.*
7588318543.