नापास विद्यार्थ्यांना माझा सॅल्यूट ……….🌼
नापास हा शब्द किती साधा सोपा सरळ वाटतो ना ! पण या एका नापास मध्ये किती दिवसांची मेहनत आहे याचा विचार हल्ली बरेच लोक करताना दिसत नाहीत. एखादी साधी परीक्षा पास न झाल्यामुळे त्या विद्यार्थ्याला नापास ची पदवी समाज सहज देत असतो. सध्याच्या आधुनिक युगात पास नापास या शब्दांपेक्षा कितवा नंबर आहे अथवा किती टक्के इतर विद्यार्थ्यांपेक्षा जास्त आहेत असा तुलनात्मक विचार केल्या जातो. पण खरच आहे का ही गोष्ट इतकी महत्वाची जेवढे महत्त्व आपण सध्या देतांना दिसतो. ज्या विद्यार्थ्याला एक दोन पॉइंटने दुसऱ्या विद्यार्थ्यापेक्षा कमी टक्के आले म्हणून तो नाराज होतो तर जो विद्यार्थी पास झाला तो माझा नंबर नाही आला म्हणून उदास होतो. पण या स्पर्धेमध्ये जो विद्यार्थी नापास होतो त्याची मनस्थिती काय असेल. जे पास अथवा जास्त टक्के घेणारे विद्यार्थी नापास विद्यार्थ्यांना तर स्वतःमधील समजतच नाही. ते जणू काही दुसऱ्या ग्रहावरून आलेत असा व्यवहार नापास विद्यार्थ्यांशी करताना आढळतात. ही तर झाली शाळा कॉलेज मधील गोष्ट. पण यानंतर सुरू होते खऱ्या जीवनातील कसरत आणि ती म्हणजे स्पर्धा परीक्षा.
हे क्षेत्र इतके व्यापक आहे की याचा आढावा घेणे साधा विद्यार्थी तसेच पालकांना सुद्धा जमत नाही. स्पर्धा परीक्षा हे जीवनातले एकमेव ध्येय जे प्राप्त करण्यासाठी विद्यार्थी या मार्गावर अविरत चालत असतो. हे ध्येय प्राप्त करण्यासाठी तो कोणत्याच गोष्टीची परवा न करता फक्त ध्येय प्राप्त करण्याचा अगणित प्रयत्न करीत असतो. स्पर्धा परीक्षा कोणत्याही क्षेत्रातील का असेना ती शेवटी स्पर्धाच असते. लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात. काही पास होतात तर काही नापास. अश्याच नापास विद्यार्थ्यांना माझा मनापासून सॅल्यूट आहे. तुम्हालाही विचार पडला असेल सॅल्यूट तर पास विद्यार्थ्यांना करत असतात पण इथे नापास विद्यार्थ्यांना सॅल्यूट का बरं करायचा. तोच महत्वाचा मुद्दा आहे. नापास विद्यार्थी हा पास जरी होत नसला तरी त्याने केलेला अभ्यास, त्याची मेहनत, त्याने दिलेल्या पेपरचे अनुभव या सर्व गोष्टींचा कटाक्षाने विचार करण्याची गरज मला वाटते. बरेच विद्यार्थी स्वतःचे घरदार, परिवार सोडून मोठ्या मोठ्या शहरांमध्ये स्पर्धा परीक्षेचे वर्ग लावतात. बाहेर रूम करून स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून पोट भरतात. काही विद्यार्थी जेवणाची मेस सुद्धा लावतात. या मध्ये स्वतःच्या हातचे अथवा मेस चे नवीन जेवण कसे लागते याबद्दल आपण चांगलेच परिचित आहोत. सकाळी लवकर उठून क्लास, ग्राउंड, वर जाऊन अभ्यास करा. तिथे नवीन अभ्यासू विद्यार्थ्यांशी हितगुज, त्यामध्ये आपण कितीतरी त्यांच्यापेक्षा कमी आहोत याची जाणीव ते करून देतात. काहीजण टारगेट करतात. त्यामध्येच तरुण वय, त्यामध्ये होणारे बदल, एकमेकांबद्दल आकर्षण, त्यात घरचे विचार, अभ्यासाचा ताण, महिना भरत आल्यावर किरायाचे पैसे घरून मागण्यासाठी लागणारी हिम्मत, या आणि अशा बऱ्याच काही गोष्टींचा सामना स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना करावा लागतो.
त्याचप्रमाणे हीच परीक्षा एखादी लग्न झालेली स्त्री अथवा पुरुष असेल तर त्यांच्या स्पर्धेत नवीन स्पर्धेची भर पडतेच. सासू सासरे, आई वडील, नातेवाईक आणि समाज या सर्वांना तोंड देत त्यांना ही स्पर्धा परीक्षा पास करावी लागते. दोन-दोन, पाच-पाच वर्ष हे विद्यार्थी स्वतःच्या आयुष्याची, स्वतःच्या स्वप्नांची परवा न करता फक्त ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करतात. काही वेळेस प्रथम परीक्षा पास होतात मग मुख्य परिक्षेपर्यंत पोहचतात. तेथून पॉईंटच्या फरकाने नापास होतात मग पुन्हा प्रथम पूर्व परीक्षेला बसतात. पुन्हा तोच प्रवास तोच अभ्यास तीच परिस्थिती. तसेच यामध्ये होणारे गैरप्रकार, निकाल उशिरा लागणे, त्यामध्येच वय निघून जाणे. खरच यांच्या आयुष्याला जवळून बघितले तरी माझ्या अंगावर काटे येतात. किती मोठा तो त्याग. सर्व समाजापासून अलिप्त राहून अधिकारी बनून देशाची सेवा करायची. देशासाठी, समाजासाठी, परिवारासाठी सर्व काही करायचे. स्वतःला विसरून इतरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी डोळ्यात तेल घालून दिवसरात्र फक्त अभ्यास करायचा. आणि एवढं सगळे करून नापास झाल तर हेच सर्व लोक त्या विद्यार्थ्याला समाजात जगणे सुद्धा कठीण करतात. कोणी टोमणे मारून, कोणी तुच्छ वागणूक देऊन, तर कोणी त्याला पुन्हा पुन्हा नापास झाल्याची जाणीव करून देऊन. याच समाजासाठी तो विद्यार्थी आतापर्यंत स्वतःशी प्रामाणिकपणे झगडत होता आणि हाच समाज आता त्याला स्वतःमधील घटक समजण्यास नकार देतो. म्हणून माझ्या तरी दृष्टीकोनातून विचार केल्यास मला नापास विद्यार्थी सुद्धा एक योग्य मानाचा नागरीक वाटतो. तो विद्यार्थी ज्या अनुभवातून ज्या अभ्यासातून पुढे जावून नापास जरी झाला असेल तरी त्याने त्याच्या धेयापर्यंत जाण्यासाठी लागणारा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. तो आज नसेल कोणता अधिकारी वा नसेल कोणत्याही पोस्ट वर तरी सुद्धा त्याने कमविलेले ज्ञान कधीच व्यर्थ नसते. त्याला प्रत्येक गोष्टीतले बारकावे माहिती असतात, देशाचा नागरिक म्हणून कर्तव्य जबाबदारी, नियम, सर्व गोष्टींचे ज्ञान असते. असा विद्यार्थी नापास जरी होत असेल तरी माझ्या मते तो एका गावाचा अधिकारी नक्कीच आहे आणि गावाचा नसेलही तरी त्यांच्या परिवारातील तरी नक्कीच आहे. अशाच प्रकारचे बरेच नापास विद्यार्थी समाजात मला दिसतात. त्यांच्या ज्ञानाचा अथांग सागर नेहमी वाहत असतो. दुसरे एखादी चुकी करताना बघून त्यांचे मन खळवळून येते तेंव्हा ते विद्यार्थी स्वतः केलेली चुकी कोणी करू नये यासाठी स्वतःचे ज्ञान, अनुभव त्यांना सांगतात. पण या नापास विद्यार्थ्यांना बरेच वेळा अपमानास्पद वागणूक देऊन डावलले जाते. अशा वागण्यामुळे ते पुन्हा कोणाची मदत करण्याचा मोह बरेचदा आवरताना दिसतात. यामुळे समाजातील बरेच विद्यार्थी पुन्हा त्याच मार्गाने जाऊन अपयशी होतात.
या सर्व गोष्टीचा विचार करता मला वाटते की एखादा विद्यार्थी नापास जरी झाला तरी कुटुंब, मित्रमंडळी, समाज यांनी त्या विद्यार्थ्याला प्रोत्साहन द्यावे. त्यांच्या विविध कल्पनेला चालना द्यावी. त्यांच्या प्रत्येक निर्णयात सोबत राहावे. हिमतीने समोर जाण्यास प्रेरणा द्यावी आणि तरीही नापास झाल्यास धीर द्यावा. यामुळे कोणताच नापास विद्यार्थी आत्महत्या करणार नाही. त्याच्या मनात नेहमी आशेची किरणे जागृत राहतील. सरकारी अधिकारी नाही बनला तरी तो त्याच्या मनाचा अधिकारी बनून समाजाला समोर नेईल. समाजामध्ये उच्चशिक्षीत नापास विद्यार्थी बरेच आहेत. फरक एवढाच की कोणी स्पर्धेत नापास होतो तर कोणी जीवनात. आता वेळ आहे अशा सर्व नापास विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन समोर आणण्याची. देशातील प्रत्येक नापास विद्यार्थ्याच्या पाठीशी उभे राहून सक्षम भारत बनवण्याची.
शेवटी म्हणतात ना “घायल तो यहाँ हर एक परिंदा है, मगर फिर से जो उड़ सका वही जिंदा है, वही जिंदा है”…….एवढंच सांगावस वाटतंय आपली सुद्धा वेळ आहे प्रयत्न करण्याची, नापास विद्यार्थ्यांना नवी दिशा दाखवण्याची. प्रयत्न करून नापास होणाऱ्या अशा विद्यार्थ्यांना माझा पुन्हा एकदा मनःपूर्वक
सॅल्यूट, सलाम, नमस्कार………..
✍️✍️कु. हर्षा बाबुराव खंडागळे.
मु.पो. खामगाव, जिल्हा बुलढाणा. महाराष्ट्र.
मो. नंबर. 9890994741.
*संवाद मिडिया*
🤵♀🤵♂👩⚖️🧑⚖️🤵♀🤵♂👩⚖️🧑⚖️🤵♀🤵♂
*प्रवेश सुरू.. प्रवेश.. सुरू… प्रवेश सुरु! 2024-2025*
*१०वी – १२वी नंतर इंजिनिअरिंग व फार्मसी अभ्यासक्रमांना प्रवेश सुरु..!*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नं.१ एज्युकेशनल कॅम्पस
*भोसले नॉलेज सिटी* येथे
*👉१०वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️सिव्हील इंजिनिअरिंग
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
https://sanwadmedia.com/138036/
*👉१२ वी नंतर डिग्री इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग
*यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी*
मुंबई विद्यापीठ संलग्न व एनबीए मानांकित अभियांत्रिकी महाविद्यालय
https://www.ybit.ac.in
*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲9404272566*
*डिग्री :*
*📲 9604272566*
*👉१२ वी नंतर डिग्री/डिप्लोमा फार्मसीला प्रवेश सुरु!*
▪️डी.फार्म
▪️बी.फार्म
▪️एम.फार्म
*यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी*
मुंबई विद्यापीठ संलग्न व नॅक मान्यताप्राप्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव फार्मसी कॉलेज
www.sybespharmacy.com
*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲8600380717*
*डिग्री:*
*📲8275651704*
*भोसले नॉलेज सिटी*
*चराठे, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*
www.bkcedu.com
*Advt Web link*
https://sanwadmedia.com/138036/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*