You are currently viewing वामनराव महाडिक विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

वामनराव महाडिक विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

तळेरे :

योगासने मानवाला ताण-तणाव, आजार यांपासून दूर ठेवतात. निरोगी, सक्षम बनवितात. म्हणून योगाला आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. दरवर्षी 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो.

वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तळेरे येथे 10 वा जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. सुरुवातीला ज्येष्ठ शिक्षक सी.व्ही.काटे यांनी योगाचे महत्त्व विशद करताना विद्यार्थ्यांनी योगाचा नियमित सराव करून आपले आयुष्य आनंदी व निरोगी ठेवावे असा संदेश दिला.

यावेळी सार्थक डंबे, जानवी मालनकर यांनी चक्रासन, केतकी वायंगणकर – सूर्यनमस्कार, अर्णव सुर्वे-धनुरासन, संपदा चव्हाण- वक्रासन, शवासन, विराट भोगले – पवनासन, चैतन्या जाधव – त्रिकोणासन, निष्ठा पांचाळ – कपालभाती, दुर्वा कुमठेकर – सिंहासन, पद्मासन, शुभांगी घाडी – पर्वतासन, अथर्व जठार- सर्वांगासन, हलासन, वैदही जंगले – धनुरासन, मयूर मेस्त्री – शिर्षासन आदी योगासनातील आसनांची प्रात्यक्षिके सादर केली. इतर विद्यार्थ्यांनी ही या आसनांचा सराव केला.

यावेळी स्काऊट – गाईड शिक्षक डी.सी.तळेकर, पी.एन.काणेकर, क्रिडा शिक्षक एन.बी.तडवी, आदी शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन सहा.शिक्षक ए.पी.कोकरे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा