You are currently viewing एकनाथ नाडकर्णीना आता विधानसभेची उमेदवारी द्या – प्रवीण गावकर

एकनाथ नाडकर्णीना आता विधानसभेची उमेदवारी द्या – प्रवीण गावकर

एकनाथ नाडकर्णीना आता विधानसभेची उमेदवारी द्या – प्रवीण गावकर

सावंतवाडी

समाजकारण व राजकारणात कार्यरत असलेल्या एकनाथ नाडकर्णी यांना भाजपने आता विधानसभेची उमेदवारी द्यावी, नाडकर्णी यांनी आपल्या राजकीय जीवनात वेगवेगळ्या पदांचा उपयोग जनतेच्या हितासाठी केला आहे. शिवसेनेमध्ये असताना त्यांनी दोडामार्गसह सावंतवाडी व वेंगुर्ला तालुक्यांमध्ये दांडगा जनसंपर्क ठेवला होता. त्यामुळे याचा फायदा विधानसभा निवडणुकीत नक्की होईल, असा विश्वास भाजपचे प्रवीण गावकर यांनी व्यक्त केला आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे. यात असे म्हटले आहे की, गेली चाळीसहून अधिक वर्षे एकनाथ नाडकर्णी हे राजकारण आणि समाजकारणात आहेत. सुरवातीला शिवसेना, काँग्रेस व आता भाजपात काम करत असताना आपल्या पदांचा उपयोग जनतेच्या हितासाठी कसा होईल याचाच अधिक विचार त्यांनी केला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून काम करताना त्यांनी दोडामार्गसह सावंतवाडी, वेंगुर्ला तालुक्यांमध्ये दांडगा जनसंपर्क ठेवला होता. कळणे खनिज प्रकल्पा विरोधात लढताना त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. काँग्रेस मध्ये प्रवेश करताना त्यांनी दोडामार्ग तालुक्याच्या रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी तालुक्यात एम. आय. डी. सी आणण्याची मागणी नारायण राणेंकडे केली. त्यानुसार आडाळीत एम. आय. डी. सी प्रकल्पाला मंजुरी दिली. त्यानंतर प्रत्यक्ष प्रकल्प उभा रहावा म्हणून सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यामुळे आता भविष्यात दोडामार्ग, बांदा परिसरातील हजारो तरुणांना आडाळीत रोजगाराची संधी निर्माण होणार आहे.
जिल्हा परिषद सदस्य व उपाध्यक्ष असताना नाडकर्णी यांच्या माध्यमातून कोट्यावधींची विकासकामे तालुक्यात झाली. रोजगारासाठी गोव्यात जाणाऱ्या नागरिकांना जवळच रस्ता व्हावा म्हणून कळणे-करमळी रस्त्यावर त्यांनी पूल बांधून घेतला. त्याचा फायदा आता शेकडो नागरिकांना रोजच्या येण्याजाण्यासाठी होत आहे. अशाप्रकारची दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वावर येथील जनतेचाही विश्वास आहे. तसेच व्यक्तिगत कामांसाठी देखील नागरिक नाडकर्णी यांच्या संपर्कात असतात. सामाजिक, क्रीडा, धार्मिक, सांस्कृतिक उपक्रमात नाडकर्णी यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यामुळे जनतेमध्ये त्यांची लोकप्रियता आहे. शिवसेना, काँग्रेस व आता भाजपा या तिन्ही पक्षातील ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क आहे. शिवाय उमेदवारी मिळाल्यास दोडामार्ग, बांदा परिसर एकसंघपणे त्यांच्या मागे राहू शकतो. एवढ्या वर्षात दोडामार्गला स्थानिक आमदार मिळालेला नाही. तीही कसर नाडकर्णी यांच्या रुपाने भरून निघू शकते. त्यामुळे आगामी विधामसभा निवडणुकीत भाजपाने नाडकर्णी यांना उमेदवारी द्यावी. असे यात म्हटले आहे.

*संवाद मिडिया*

*Pune’s Largest Chain of Pre- School Now in SAWANTWADI*

👩🏻‍🏫 *GURU GLOBAL SCHOOL* 👩🏻‍🏫

🟢 *Admission Open 2024-2025* 🟢

📚 *Syllabus as per CBSE* 📚

🧮प्ले स्कूल: 2-3 वर्ष
🧮नर्सरी: 3-4 वर्ष
🧮ज्युनिअर केजी: 4-5 वर्ष
🧮सिनियर: 5-6 वर्ष

❇️ *आमची विशेषता* ❇️

✅High Qualified Staff
✅100 + pre School across India
✅Award Winning School
✅Unique Teaching Methodology
✅ABACUS & PHONICS

🟪 *After School Programs* 🟪

🧮📚 *ABACUS Makes Your Child Faster & Smarter* 🧮📚

📚Imagination
📚Creativity
📚Photographic Memory
📚Application
📚Observation
📚Self Confidence
📚Judgement
📚Reasoning
📚PHONICS

*🧮📚मग वाट कसली पाहताय आजंच तुमच्या पाल्याला स्मार्ट आणि इंटेलिजन्स करण्यासाठी प्रवेश निश्चित करा 🧮📚*

🔶We Mentor your child *READ* 🔷
🔶 *WRITE* 🔷Accurately and 🔶 *SPEAK*🔷 fluently

🟩 *Call For Admission* 🟩

🟢 *MRS.SARITA PHADNIS*

*📱9922903515*
*📱9420785879*
*📱9172693343*

🛣️ *आमचा पत्ता*

*Shri Datta Krupa Residency Opp UCO Bank, Bhind Fish Market, Sawantwadi, Sindhudurg, Maharashtra*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/131177/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा