*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*वयाला हरवा!अन्…उडून जा..!*
कधीतरी जग तुम्हांला
वाढत्या वयाची आठवण करून देईल
इतकं की तुमचं मन घायाळ होवून
दुःखाने डोळे तुमचे पाणावतील
हातात तुमच्या तस काहीच नसत
अश्यावेळी शब्दांना थांबायला सांगा
उगाच व्यर्थ विरोध करू नका
साधे व्हा!निरागस व्हा!नमस्कार सांगा
अश्यावेळी छंदाना जवळ करा
तेच वाढत्या वयाला हरवतील
प्रतिमा,प्रतिक,रूपकं सोबतीला घ्या
मुकाटपणे तेच तुमचे चाहते होतील
दबलेल्या मौन हुंकारांना उच्चारा
कां त्रास करून घेता स्वतःला
निसर्गात राहून प्रकाशाला प्राशन करा
चैतन्याचा आधाराने!जाणिवांना टाळा
शाप,शपथ,वरदान!विसरून
पुढचा हरएक क्षण स्वतः करता जगा
आभासी दुनियेत उन्मादाला शोधा
पिंज-याच दार उघडचं आहे!मस्त जगा
अन् उडून जा….!भुर्र भुर्र भुर्र..!!
बाबा ठाकूर धन्यवाद