You are currently viewing योगा दिन..

योगा दिन..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या ज्येष्ठ कवयित्री उज्वला सहस्त्रबुद्धे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*योगा दिन..*

 

योग येतो जीवनी ,

घेऊनी संजीवनी !

आरोग्य आणि संपदा,

हातात हात घेऊनी !

 

जगी पटली सर्वांना ,

योगाची अद्भुत किमया!

लोपली होती कालांतरी,

भुलवी भौतिक माया!

 

भौतिकाची ओढ होती,

सुदृढ शरीर दुर्लक्षित !

योग अन् व्यायामाची,

हरपली होती रीत !

 

योगगुरुची गरज होती,

आधुनिक जगाला!

रामदेव रुपे धावत आला,

कृष्ण अपुल्या साथीला!

 

निरामय योग शिकवला,

रामदेव बाबांनी !

होऊ सगळे योगाभ्यासी,

सफल होऊ जीवनी!

 

उज्वला सहस्रबुद्धे

प्रतिक्रिया व्यक्त करा