You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवानंद लुबडे पदमुक्त

सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवानंद लुबडे पदमुक्त

सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदावरून देवानंद लुबडे पदमुक्त

कार्याध्यक्षपदी सिद्धेश परब व किरण टेंबुलकर यांची निवड…

सिंधुदुर्ग / प्रतिनिधी :-

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदावरून देवानंद लुबडे यांना पदमुक्त केले आहे. जिल्हा युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी सिद्धेश परब व किरण टेंबुलकर यांची निवड झाल्याचे पत्र तांबे यांनी दिले आहे.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी वेंगुर्ले पंचायत समितीचे उपसभापती सिद्धेश परब व किरण टेंबुलकर यांची नियुत्ती झाली आहे.दरम्यान अनुसूचित जाती जमाती विभागाचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ टोमके यांना हटवून सावंतवाडीचे सुनील निरवडेकर यांच्याकडे या विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा