*स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये जागतिक संगीत दिन उत्साहात साजरा :*
सावंतवाडी
आज दिनांक २१ जून २०२४ रोजी जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल, कोलगाव येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. यानंतर इयत्ता ६ वी ची विद्यार्थिनी कु. अस्मि सावंत हिने जागतिक संगीत दिनाची माहिती सांगितली. तर इयत्ता ५ वी ची विद्यार्थिनी कु. मनवा साळगावकर हिने मानवी जीवनात असलेले संगीताचे महत्व सांगितले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वादनांचे स्पष्टीकरण दिले. यामध्ये प्रथम इयत्ता ५ वी चा विद्यार्थी कु. इशान किनळेकर व इयत्ता ४ थी ची विद्यार्थिनी कु. लिशा सामंत यांनी सिंथेसायझर वर ‘ हम होंगे कामयाब ‘ हे गीत सादर केले. यानंतर कु. ऋतुजा पेडणेकर हिने हार्मोनियमवर राग देस सादर केला. प्रशालेच्या वाद्यवृंदाच्या विद्यार्थिनी कु. अस्मि प्रभू तेंडोलकर , कु. अस्मि सावंत, कु. स्पृहा आरोंदेकर, कु. मनवा साळगावकर, कु. प्रत्युषा घोगले यांनी राग भूपचे सादरीकरण केले. या सर्वांना तबल्याची साथ इयत्ता ६ वी चा विद्यार्थी कु. राज गवस याने केली. प्रशालेत विद्यार्थ्यांच्या माहितीकरिता वाद्यांचे प्रदर्शन भरवले गेले होते. या प्रदर्शनाकरीता शालेय संगीत शिक्षक श्री. कपिल कांबळी व सहा. शिक्षिका कु. विनायकी जबडे यांचे सहकार्य लाभले. या प्रदर्शनामध्ये ड्रम्स, पियानो, हार्मोनियम, बासरी, वीणा अशी अनेक वाद्ये प्रदर्शित करण्यात आली होती. या वाद्यांविषयी अनुक्रमे, कु. इशान किनळेकर, कु. सक्षम ओटवणेकर, कु. लिशा सामंत, कु. राज गवस, कु. अस्मि सावंत, कु. वैष्णव सावंत व कु. ऋतुजा पेडणेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना माहिती दिली. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना शालेय संगीत शिक्षक श्री. कपिल कांबळी यांचे मार्गदर्शन लाभले. अशाप्रकारे, वरील कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. शाळेचे संचालक श्री. ऋजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.