You are currently viewing मोरीचे काम पुर्ण झाल्याने रस्ता वाहतुकीस खुला…

मोरीचे काम पुर्ण झाल्याने रस्ता वाहतुकीस खुला…

मोरीचे काम पुर्ण झाल्याने रस्ता वाहतुकीस खुला…

मालवण

मोरी बांधण्याचे काम हाती घेतल्यानंतर वाहतुकीस बंद असणारा हा रस्ता मोरीचे काम पूर्णत्वास गेल्याने खुला करण्यात आला आहे. या रस्त्यावर नवीन मोरी बांधण्यात आल्याने या भागात साचणाऱ्या पाण्याचा निचरा सुलभ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कसाल मालवण हमरस्त्यावरील शहरातील हॉटेल स्वामी नजिकच्या रस्त्यावर मोरी बांधण्याच्या दृष्टीने साचणारे पावसाचे पाणी निचरा होण्याच्या दृष्टीने मालवण नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाने आठ दिवसांपूर्वी मोरी बांधण्याचे काम हाती घेतल्याने हा रस्ता १४ जुनपासून बंद केला होता. सदरील काम पूर्ण झाल्याने आजपासून हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत सुरु करण्यात आला आहे. या कालावधीत नागरीक, विदयार्थी, वाहनचालक, पादचारी व पर्यटक यांनी पर्यायी मार्गाचा वापर करुन रोड क्रॉसिंग गटार बांधकाम करण्यास सहकार्य केल्याबद्दल नगरपालिकेने आभार मानले आहेत.

मालवण नगरपरिषद बांधकाम विभागाने आगामी पावसाळा कालावधी विचारात घेऊन आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने मामा वरेरकर नाट्यगृह नजीक स्वामी हॉटेल जवळ पावसाळी पाणी निचरा होण्यासाठी आरसीसी रोड क्रॉसिंग गटर बांधकाम करणेकरीता राज्य मार्ग क्र. १८२ (मालवण कसाल) वझे कॉर्नर ते मामा वरेरकर नाट्यगृह ते हॉटेल स्वामी ते भरड मार्गावरील वाहतूक १४ जुन पासून पुढील किमान ७ दिवस बंद ठेवली होती. हे काम पूर्णत्वास गेले असून आज पासून राज्य मार्ग क्र. १८२ (मालवण कसाल) वझे कॉर्नर ते मामा वरेरकर नाट्यगृह ते हॉटेल स्वामी ते भरड हा मार्ग वाहतुकीस पूर्ववत खुला केला आहे, अशी माहिती नगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा