You are currently viewing आंबेरी येथुन होत असलेल्या अवैधरित्या वाळू वाहतुकीमुळे रस्त्यालगत असलेल्या घराला धोका

आंबेरी येथुन होत असलेल्या अवैधरित्या वाळू वाहतुकीमुळे रस्त्यालगत असलेल्या घराला धोका

घरमालक सुधा गोरे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांचे वेधले लक्ष

ओरोस

मालवण तालुक्यातील आंबेरी (वाकवाडी) येथुन अवैधरित्या वाळू वाहतूक होत असल्याने आपल्या रस्त्यालगत असलेल्या घराला धोका निर्माण झाला आहे. याबाबत आंबेरी येथील सुधा गोरे यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांचे लक्ष वेधले आहेत तर संबंधित वाळू वाहतुकीवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे. मालवण तालुक्यातील आंबेरी (वाकवाडी) येथील रहीवाशी सुधा गोरे यांनी आज अवैध वाळू वाहतुक होत असल्या बाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या निवेदनात त्यांनी आपल्या घराशेजारी रस्त्यावरून दुपारी ३ वाजल्यापासून रात्री २ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक सुरू असते. या रस्त्यालगत असलेल्या आपल्या जुन्या घराला त्याचा धोका निर्माण झाला आहे .गतवर्षी अवैध वाळू वाहतुकिमुळे घरावर झाड पडून नुकसान झाले होते. त्याची पुनरावृत्ती होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे जीव मुठीत घेऊन घरात वास्तव्य करावे लागत आहे. असे या निवेदनात नमूद केले आहे. तर याबाबत गंभीर दखल घेत अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करावी. अशी मागणी सुधा गोरे यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा