*योग हा आपल्या जीवनातील महत्वाच्या घटक बनू द्या*-शेखर बांदेकर
*बांदा केंद्रशाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहाने साजरा*
*बांदा*
योग ही एक जीवनशैली असून आपले शरीर, मन व आत्मा यांना एकत्र आणण्याचे काम योगामुळे होते.योग हा आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा घटक बनू द्या असे प्रतिपादन दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने पतंजली योग समिती सिंधुदुर्गचे जिल्हा प्रभारी शेखर बांदेकर यांनी व्यक्त केले.
योगाची जनजागृती व्हावी म्हणून दरवर्षी २१जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. पी एम श्री जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं.१या शाळेतही हा दिवस स्काऊट गाईड व बांदा पतंजली योग समिती यांच्या वतीने मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.या वेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे, मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये ,योगसाधक तेजस परब ,उपशिक्षक शांताराम असनकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून योगवर्गाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारचे सु्क्ष्म व्यायाम, विविध प्रकारची आसने करून घेण्यात आली तसेच प्राणायाम बद्दल माहिती देण्यात आली. योग दिनाच्या निमित्ताने शाळा परिसरात विद्यार्थ्यांना हस्ते वृक्षारोपण ही करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक उर्मिला मोर्ये यांनी केले सुत्रसंचलन जे.डी पाटील तर आभार शांताराम असनकर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी रसिका मालवणकर , शुभेच्छा सावंत ,जागृती धुरी, फ्रान्सिस फर्नांडिस,कृपा कांबळे परिश्रम घेतले.
*संवाद मिडिया*
🤵♀🤵♀🤵♀🤵♀🤵♀🤵♀🤵♀🤵♀🤵♀
*BCA प्रवेश प्रक्रिया 2024- 2025 सुरू*
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी*.
एस.एन.डी. टी. महिला विद्यापीठ संलग्न
*BCA प्रवेश प्रक्रिया 2024- 2025*
बारावीनंतर बीसीए डिग्री कोर्स 2024-25 ऍडमिशन करिता आजच आपली नोंदणी खाली दिलेल्या लिंक वरती करावी .
https://forms.gle/3MAKqpBiCSpKYmB5A
कोणत्याही शाखेच्या( आर्ट्स /कॉमर्स/ सायन्स) , गणित किंवा गणित विषया शिवाय बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना येथे प्रवेश मिळू शकतो.
*अधिक माहितीसाठी* 👇
*📲7972997567*
*📲9420274119*
या मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष भेट द्यावी.
*पत्ता: महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी,साखरतर रोड, शिरगाव ,रत्नागिरी.*
*Advt Web link*
https://sanwadmedia.com/138548/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*