You are currently viewing वेंगुर्ल्यात ठिकठिकाणी वटपौर्णिमा उत्साहात साजरी

वेंगुर्ल्यात ठिकठिकाणी वटपौर्णिमा उत्साहात साजरी

वेंगुर्ल्यात ठिकठिकाणी वटपौर्णिमा उत्साहात साजरी

वेंगुर्ला

वटसावित्री दिवशी सुवासिनी महिला वडाची पूजा करुन आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. हा वटपौर्णिमेचा सण तालुक्यासह शहरात महिलांनी उत्साहात साजरा केला. काही महिलांनी वटवृक्षाकडे एकत्र येत तर काही महिलांनी घरोघरी वडाच्या फांदीचे पूजन केले.

वेंगुर्ला शहरात साकव व घोडेबांव उद्यान येथे सकाळपासूनच महिलांची वर्दळ दिसत होती. ब्राह्मणांच्या मंत्र घोषात महिलांनी वटवृक्षाची पूजा केली. नविन लग्न झालेल्या नवदांपत्यांची ही पहिलीच वटपौर्णिमा होती. त्यामुळे अशा नवदांपत्यांनी एकत्रित वटवृक्षाची पूजा केली. महिलांनी वडाला सुत गुंडाळून आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे यासाठी प्रार्थना केली. त्यानंतर एकमेकांना रानमेव्यांचे वाण देऊन शुभेच्छा दिल्या

प्रतिक्रिया व्यक्त करा