You are currently viewing कानोसा

कानोसा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कानोसा*

 

वाहून ये रे धावून ये रे

तू रे जरा पावसा

 

अंत नको पाहू आता

घे रे माझ्या मनाचा

थोडासा जरासा

कानोसा

 

वाहून ये रे धावून ये रे

तू रे जरा पावसा

 

धरणी तापली

कोरडं पडली

माती बी सुकली

ढेकूळ फोडाया

ये रे आता

 

वाहून ये रे धावून ये रे

तू रे जरा पावसा

 

नदी ही आटली

पाने ही गळाली

शिवार ओसाडं

भिजवं आवार आतां

 

वाहून ये रे धावून ये रे

तू रे जरा पावसा

 

कर्जाचा डोंगर

सावकारी शिकार

माझा शेतकरी राजा

कृपेने वर्षावं

सोनं उगवावं

फिटेल कर्जाचा बोजा

 

वाहून ये रे धावून ये रे

तू रे जरा पावसा

 

अंत नको पाहू आता

घे रे माझ्या मनाचा

थोडासा जरासा

कानोसा

 

कवी:-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर, धुळे.*

7588318543.

प्रतिक्रिया व्यक्त करा