*राष्ट्रीय योगासन कोचिंग ट्रेनिंग प्रोग्रॅम मध्ये दारूमच्या ‘संजय भोसले’ यांची उत्तुंग भरारी!*
*:योगामधून राष्ट्रीय प्रशिक्षक होण्याचा कोकणसह प.महाराष्ट्रातून पहिला मान!*
तळेरे – प्रतिनिधी
स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया ,खेलो इंडिया, आणि योगासन भारत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित द्वितीय नॅशनल योगासन कोचिंग ट्रेनिंग प्रोग्रॅम ,लेवल कोर्स एन.आय.एस.पटियाला
(नेताजी सुभाषचंद्र क्रीडा प्रशिक्षण संस्था)पंजाब येथे नुकताच संपन्न झाला.या प्रशिक्षणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रख्यात योग मार्गदर्शक कणकवली तालुक्यातील दारूम गावचे रहिवासी आणि कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त पर्यवेक्षक संजय भोसले यांनी उत्तम यश संपादन केले आहे.प.महाराष्ट्रातुन तसेच कोकणातून योगासनमध्ये राष्ट्रीय प्रशिक्षक होण्याचा पहिला मान संजय भोसले यांनी मिळवला आहे.
संजय भोसले हे पतंजली योगाचे सदस्य तसेच सिंधुदुर्ग योगासन स्पोर्टस् असोसिएशनचे सहसचिव म्हणून कार्यरत आहेत.
पटियाला येथील कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून योगासन भारत चे जयदीप आर्य,आफ्रिकेचे योग प्रचारक जयराम ठाकूर,
टांझानियातील योगासन संचालिका मरियम मॅक्स ,चंद्रकांत शर्मा,एन. आय.एस.पटियालाचे डायरेक्टर डॉ.कल्पना शर्मा, डॉ.निरंजन मूर्ती, ऑर्गनायझिंग कमिटीचे प्रमुख पियुषकांत मिश्रा, प्रसार माध्यम सोशल मीडिया डायरेक्टर रोहित कौशिक, पंजाब स्पोर्ट्स असोसिएशनचे चिफ अकल कला आदि मान्यवर उपस्थित होते.
पंजाब पटियाला येथे घेण्यात आलेल्या योगासन कोचिंगसाठी महाराष्ट्रातून ९ योगासन प्रशिक्षक समाविष्ठ होते. तर देशभरातून तब्बल १५० योगासन प्रशिक्षक सहभागी झाले होते.सलग ६ दिवस चाललेल्या या ट्रेनिंगमध्ये देश- विदेशातील तज्ञ व्यक्तींचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
सदरच्या ट्रेनिंग मध्ये योगामधील सर्व प्रकारच्या काठीण्य पातळ्यांचा प्रशिक्षणात समावेश करण्यात आला होता. यामध्ये मैदानी सराव ,वाॅर्म अप, लेखी-तोंडी परीक्षा, प्रॅक्टिकल,प्रोजेक्ट व इतर बाबींचा समावेश होता.
या ठिकाणच्या प्रशिक्षना दरम्यान पंजाब राज्यातील पोलीसाच्या पंचकूलातून आय.टी.बी.टी.ग्रुपने सुंदर आणि अतिशय आकर्षक योगासन प्रात्यक्षिकांचे मार्गदर्शन केले तसेच लयबद्ध आणि तालबद्ध पद्धतीने योगासनाची बहारदार प्रात्यक्षिकेही सादर केली”.
संजय भोसले यांना या राष्ट्रीय प्रशिक्षणात योगासन भारत चे सेक्रेटरी जयदीप आर्य ,टी. युवराज ,(कर्नाटक ) डॉ. राहुल तिवारी ,डॉ. रोनक कोठारी ,डॉ.नीलिमा देशपांडे, विष्णू चक्रवर्ती , डॉ.विपिनदीप थापर ,कुमारी परिणीता,मोनिमिंटो सिंग, डॉ. उमेश नारंग ,श्री राघवेंद्र, इंटरनॅशनल कोच जॉली ठाकूर, कोमल वर्मा,( हरियाणा) पियुष खान,डॉ. निरंजन मूर्ती ,श्रेयश,ज्योती शर्मा, जयराम ठाकूर ,(आफ्रिका) मरियम मॅक्स ,(टांझानिया) आदीं देशी -विदेशी तज्ञ प्रशिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. योगासन प्रशिक्षक संजय भोसले यांच्या राष्ट्रीय कामगिरीबद्दल त्यांचे सर्वचस्तरातून अभिनंदन होत आहे.
*संवाद मिडिया*
🤵♀🤵♀🤵♀🤵♀🤵♀🤵♀🤵♀🤵♀🤵♀
*BCA प्रवेश प्रक्रिया 2024- 2025 सुरू*
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी*.
एस.एन.डी. टी. महिला विद्यापीठ संलग्न
*BCA प्रवेश प्रक्रिया 2024- 2025*
बारावीनंतर बीसीए डिग्री कोर्स 2024-25 ऍडमिशन करिता आजच आपली नोंदणी खाली दिलेल्या लिंक वरती करावी .
https://forms.gle/3MAKqpBiCSpKYmB5A
कोणत्याही शाखेच्या( आर्ट्स /कॉमर्स/ सायन्स) , गणित किंवा गणित विषया शिवाय बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना येथे प्रवेश मिळू शकतो.
*अधिक माहितीसाठी* 👇
*📲7972997567*
*📲9420274119*
या मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष भेट द्यावी.
*पत्ता: महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी,साखरतर रोड, शिरगाव ,रत्नागिरी.*
*Advt Web link*
https://sanwadmedia.com/138548/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*