You are currently viewing सोनुर्ली प्रशालेचे शिक्षक प्रदीप सावंत यांना “लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार” जाहीर…

सोनुर्ली प्रशालेचे शिक्षक प्रदीप सावंत यांना “लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार” जाहीर…

सोनुर्ली प्रशालेचे शिक्षक प्रदीप सावंत यांना “लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार” जाहीर…

सावंतवाडी

अविष्कार सोशियल अँड एज्युकेशनल फाउंडेशन कोल्हापूर यांच्या माध्यमातून देण्यात येणारा “लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार” यावर्षी माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्ली प्रशालेचे सहाय्यक शिक्षक प्रदीप सावंत यांना जाहीर करण्यात आला आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना प्रतिवर्षी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार यांनी पुरस्कारासाठी निवडीचे पत्र दिले आहे.

प्रदीप सावंत हे गेली २६ वर्षे सोनुर्ली विद्यालयात इंग्रजी विषयाचे अध्यापन करतात, त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेली असून ते, सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर सहकारी पतपेढीच्या संचालक पदी काम करत आहेत. तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था भारत या संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी ते कार्यरत आहेत. प्रदीप सावंत यांचे शालेय शिक्षण कणकवली तालुक्यातील शिवडाव गावात झाले असून या यशाबद्दल श्री. सावंत यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या पुरस्काराचे वितरण ३० जूनला कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक सभागृहात होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा