*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी अरुण वि. देशपांडे लिखित श्री गजानन विजय काव्यांजली*
*काव्यपुष्प – ५० वे*
अध्याय – ९ वा, कविता – २ री
—————————————–
श्री संत गजाननाचा सहवास । लाभला शेगावास । कृपा सर्वांवरी खास । असे स्वामींची ।। १ ।।
श्री गजाननाला। गोविंदबुवा मळ्यात येती भेटायला । पाहुनी सोबत घोडयाला । आणले इथे याला कशाला ? । लोक विचारती ।। २ ।।
गोविंदबुवा बोलले । चिंतेचे कारण ना आता उरले । घोड्यास शहाणे केले । काल साक्षात समर्थांनी ।। ३ ।।
शेगावी यात्रेकरू येती । स्वामी दर्शन, हेतू चित्ती । नवस मनीचा फेडीती । स्वामींच्या समोरी ।।४ ।।
बाळापूरच्या दोन व्यक्ती । नित्य दर्शना शेगावी येती ।
दरवेळी विसरती । आणण्या जिन्नस नवसाचा ।।५ ।।
गजानन बोलती भास्करा । तू इकडे पहा जरा । लोक काही
बोलती नवस खरा । परी जाती विसरून नवस जो केला ।।६।।
स्वामी म्हणती- मनी असावी निर्मळता । बोलण्यात सत्यता । तरच शब्दात येईल मौलिक ता । जी आवडते भगवंता ।।७।।
बाळापूरच्या त्या दोघांना । बोल स्वामींचे कळाले मना ।
स्वामी बोले- त्यांना । बोलण्यात ठेवा मेळ रे ।।८ ।।
———
क्रमशः करी लेखन कवी अरुणदास ।।
—————————————–
-अरुण वि.देशपांडे-पुणे
—————————————–