*गझल मंच, गझल मंथन, गझल प्राविण्य आदी समूहाच्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शोभा वागळे लिखित अप्रतिम वृत्तबद्ध काव्यरचना*
*आई*
आई आई हाक मारतो
शिवाय आई कसे जगावे
आई नाही घरात आता
फक्त स्मृतींना उरी धरावे.
प्रेम स्वरुप ती माझी आई
वात्सल सिंधु होती आई
उपकार किती माझ्यावरती
जन्म तू दिला मजला आई.
कष्ट उपसले माझ्यासाठी
आजारपणी रात्र जागली
अनेक खस्ता तूच काढल्या
बाळासाठी सदैव खपली.
तळहाताच्या फोड प्रमाणे
सावरुनी ते मजला जपले
उपकार कसे मी फेडावे
सात जन्म ही अपुरे पडले
तुझी आठवण येता मजला
उम्हाळा तो हृदयी येतो
तू शिवलेल्या गोधडीमध्ये
हळूच शिरून कुश अनुभवतो.
शोभा वागळे
मुंबई.
8850466717