You are currently viewing पश्चात:बुध्दी”…..

पश्चात:बुध्दी”…..

“पश्चात:बुध्दी”….. अॅड नकुल पार्सेकर

लोकसभेचे कौतुक संपल. एका अर्थाने प्रगल्भ भारतीय मतदारानीं सगळ्यानाचं त्यांची जागा दाखवली.
आकडेवारी आणि सत्ता यामध्ये भाजपा आणि मित्रपक्षांची सरशी होवून तिसऱ्यांदा देशात मा. मोदीजींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थानापन्न झालं. या सरकारच्या गठनातील महत्त्वाचे दोन मुद्दे, मोदी शहा या जोडगोळीची दहा वर्षातील निरंकुश सत्ता जावून दक्षिणेतील बाबू व उत्तरेतील बिहारी बाबू या दोघांचे अंकुश असणारे सरकार आणि मोदी सरकार व मोदींची गॅरंटी जावून एनडीएचे सरकार व एनडीएची गॅरंटी आली.
तब्बल तीसहून जास्त पक्षाच्या इंडिया आघाडीने हे सरकार पडण्याचे स्वप्न व पाडापाडीच्या भानगडीत न पडता त्यांना कारभार करण्यासाठी संधी द्यावी. सत्ता टिकवून ठेवण्यात आणि बहुमताने सत्तेवर असणारी काही राज्यसरकारे पाडण्यात इतर कोणत्याही पक्षापेक्षा भाजपाचा हातखंडा आहे. ज्या पूर्वोत्तर राज्यात जिथे भाजपाचा एकमेव आमदार होता त्या ठिकाणीही भाजपाची सत्ता प्रस्थापित केली. इथ तर आताचा आकडा हा २९३ च्यावर आहे. या दोन्ही बाबूंचे खासदार कधी भाजपाच्या तंबूत जातील हे त्यानां समजणार पण नाही. महाराष्ट्रातील फोडाफोडी हे उत्तम उदाहरण आहे.
या निवडणुकीत चारशेपारचा नारा देणाऱ्या भाजपाला फक्त २४० जागा देवून मतदारानीं जमीनीवर का आणलं? विशेषतः उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात अनपेक्षित मोठ्ठा दणका का मिळाला?
याचं चिंतन करण्यासाठी भाजपाच्या वरीष्ठ स्तरावर चिंतन बैठका झाल्या. या दोन्ही राज्यात पराभवाची मिमांसा करताना जो प्रामुख्याने निष्कर्ष काढला गेला तो म्हणजे, भाजपाने जो चारशे पारचा नारा दिलाय तो यासाठीचं की त्याना राज्यघटना बदलायची आहे. या खोट्या प्रचारामुळे या दोन्ही राज्यात पक्षाला पराभवाला सामोरे जावं लागलं. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या महायुतीच्या रणनितीचे प्रमुख रणनितीकार देवेंद्र फडणवीस यांनी आता जाहीरपणे ही मांडणी सुरु केली.
गेल्या पाच महिन्यापूर्वी उत्तर प्रदेशचे भाजपाचे वाचाळवीर खासदार आणि इतर दोन खासदारांनी जाहीर सभांमधून जाहीर केले की, यावेळी चारशे पार करायचे आहेत कारण संविधान बदलायचे आहे. जेव्हा हे पक्षातीलचं खासदार अशी बेजबाबदार विधानं करतात तेव्हाचं याचा पक्षाने जाहीर खुलासा करून संबंधित खासदारवर निदान कारवाई करण्याचं नाटकं करायला हवं होतं. तेव्हा पक्ष गप्प राहिला त्यामुळे त्यांच्या या विधानाला मुकसंमतीच आहे असा अपप्रचार विरोधकांनी केला. त्याचा खोलवर परिणाम या दोन्ही राज्यात झाला. चारित्र्यसंपन्न लोकांचा पक्ष आणि पार्टी विथ डिफरंटची शेखी मिरवणाऱ्या पक्षाने अशा अनेक गंभीर विषयांकडे डोळेझाक केली. उत्तर प्रदेशातील बाहुबली माजी खासदार ब्रीजभूषण हे त्याचे उत्तम उदाहरण. गुन्हेगारी लोकांना पक्षात महत्त्वाचे स्थान आणि उमेदवारी दिल्याशिवाय सत्तेचं सोपानं गाठूचं शकत नाही हे सगळ्याचं राजकीय पक्षांनी अधोरेखित केलेले आहे. भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन दोन राज्यात सत्ता मिळवलेला आम आदमी पक्ष तर भ्रष्टाचारात आकंठ बुडालेला आहे. कोण्या एकेकाळी भाजपा हा तत्वनिषठ व चारित्र्यसंपन्न लोकांचा पक्ष होता.
महाराष्ट्रात ठाकरेंची सेना फोडल्यावर सत्तेचा आकडा हा अपक्षासह १७४ वर पोहचला. बहुमतासाठी फक्त १४६ ची गरज असं असतानां ज्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अडीज जिल्ह्यातील पक्ष म्हणून भाजपाचे रणनितीकार अवहेलना करत होते त्यांना त्यानीच आरोप केलेल्या, तपास यंत्रणांच्या रडावर, असलेल्या, काहीनी जेलवारी केलेल्या अजित पवारांच्या नेतृत्वाखाली अनेक मंञ्यानां सोबत का घेतलं.? एवढं कमी काय म्हणून ज्यांची पुरी हयात काँग्रेसमधी गेली, ज्यांच्यावर आदर्श घोटाळ्याचा आरोप भाजपानेच केला त्या राजकीय द्रुष्टीने उतरणीला लागलेल्या आणि नांदेडमध्ये पक्षाचा उमेदवार पराभूत झालेल्या अशोक चव्हाणांना प्रवेश केल्यापासून अवघ्या अठ्ठेचाळीस तासात खासदारकी बहाल केली.. तेव्हा जुन्या जाणत्या आणि पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या व पक्षाची बाजू प्रसारमाध्यमात प्रभावीपणे मांडणाऱ्या माधव भंडारीचा का नाही विचार केला? महाराष्ट्राच्या धुरीणीना आणि रणनितीकाराना एवढ्यावरचं थांबाव असं वाटलं नाही.. म्हणून राज ठाकरेंच्या मनसेचं इंजिन जोडलं.राज यांनी बिनशर्त पाठिंबा का दिला हे मतदारांनाच नव्हे तर त्यांच्या कार्यकर्त्यांना सुध्दा समजलेल नाही. मात्र यामुळे काही प्रमाणात उत्तर भारतीयांची मतं महायुतीला गमवावी लागली हे वास्तव नाकारता येणार नाही.
भाजपा हा बेस लाईन सर्वेवर अभ्यास
करून त्यानुसार निर्णय करत असतो, संपलेली काँग्रेस व ठाकरे सेना आणि अडीच जिल्ह्यातील उरलेला अर्ध्या जिल्ह्यातील पवारांचा पक्ष उलट सगळे बलाढ्य नेते, आमदार, खासदार, यंञणा , मोदींच्या शहांच्या प्रचार सभांचा धडाका यामुळे पंचेचाळीस प्लस सहज होईल हा फाजील आत्मविश्वास. आता तर अजितदादाना पक्षात घेण्याचा निर्णय चुकीचा होता हे संघानेच मान्य केलं. विजयाचे भागिदार अनेक असतात पण पराभवाची जबाबदारी कुणी घ्यायला पुढे येत नाही.. पण ती देवेंद्रजीनाचं ती घ्यावी लागेल कारण गेल्या दोन वर्षातील महाराष्ट्राच्या रणनितीचे रतनितिकार तेच होते. “मी पुन्हा आलो आणि एकटा नाही दोन दोन पक्ष फोडून आलो. ही जाहीर कबुली त्यानीचं दिली.
अहंकार हा नाशाकडे नेतो. सत्तेचा माज हा फार वाईट. एकदा हवा डोक्यात गेली की ना मेंदूवर ताबा राहातो ना जीभेवर.. महाराष्ट्रात देशाप्रमाणे काँग्रेस व्हेंटिलेटरवचं होती. देशात ज्या काँग्रेस पक्षाला शंभर जागा मिळाल्या त्यात राहुल व प्रियांका या भावा बहीणीचं मोठ योगदान आहे. तसेच महाराष्ट्रात या निकालात जो काँग्रेस पक्ष एक नंबरला आला त्यामध्ये ठाकरे व पवार यांचाही मोठा वाटा आहे. मात्र या अनपेक्षितपणे मिळालेल्या यशाने माञ नाना पाटोळे यांच्या डोक्यात हवा गेली.. भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे समर्थक होर्डिंग्ज काय लावतात, पाय काय धुतात, हे सगळ खरं म्हणजे नानानी त्वरित थांबावयाला हवं नाहीतर विधानसभेला पुन्हा हातात टाळ चिपळ्या घेऊन पुढची पाच वर्षे बसावं लागेल. मा. शरद पवारांनीही आपले मानसपुत्र जितेंद्र आव्हाड यानां लगाम घालावा लागेल. ठाकरेंच्या थिंक टॅंक मधले थोर विचारवंत खासदार संजय राऊत यांनीपण संयमाने वागण्याची गरज आहे.
एकंदरीत काय भारतीय जनमानस अतिशय प्रगल्भ आहे. त्यानां सदासर्वकाळ गृहीत धरुन चालत नाही. सत्तेचा माज कधी उतरवतील हे सांगता येत नाही. सत्तेच्या जोरावर वाट्टेल ते करता येतं हा भ्रम असून या भ्रमाचा भोपळा या निवडणुकीत मतदारानी फोडला आणि या अद्दल घडवली याबद्दल या देशातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील चाणाक्ष व सुजाण मतदारांचे अभिनंदन.

*संवाद मिडिया*

*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*

For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
https://sanwadmedia.com/139227/

*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच *24 जून पासून सुरू*

========================
*MHT -CET बॅच*
========================

🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
ऑफिस 9422896719

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/139227/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा