सिंधुदुर्गनगरी
लोककला व पथनाट्य यांची निवडसूची तयार करण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत संबंधित क्षेत्रातील अनुभवी संस्थाकडून विहीत नमुन्यात दि. 1 जानेवारी 2021 पासून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक संस्थांनी जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्याकडे विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रासह दि. 1 जानेवारी 2021 ते 21 जानेवारी 2021 पर्यंत मिळतील अशा बेताने पाठवावेत, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोककला व पथनाट्य (उदाहरणार्थ गण-गवळण, अभंग, पोवाडे, पथनाट्य, बहुरूपी, भारूड इत्यादी) निवडसूची तयार करण्याचे काम सुरू आहे. इच्छुक संस्थांनी जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्याकडे संपर्क साधून अर्जाचा नमुना व माहितीपत्रक प्राप्त करून घ्यावे. अथवा अर्जाचा नमुना व माहितीपत्रक www.maharashtra.gov.in आणि dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
पथकाला विविध विषयांवर (शासकीय योजनांसह) कार्यक्रम/पथनाट्य करण्याचा अनुभव असावा. पथक किमान दहा जणांचे असावे. यामध्ये स्त्री-पुरूष, वादक यांचा समावेश असावा. लोककला/पथनाट्य पथक ज्या जिल्ह्यातील असेल त्याच जिल्ह्यातून अर्ज सादर करावा. केंद्र सरकारच्या गीत व नाट्य विभागाकडे नोंदणीकृत असल्यास प्राधान्य. संस्थेकडे स्वत:ची ध्वनीक्षेपण यंत्रणा असणे अपेक्षित आहे.
दिलेली डीजीआईपीआर वेब साईट चालत नाही.
जर या वर्षीचा “लोककला आणि पथनाट्य पथक निवडसूची अर्ज” दिलात तर बार होईल
पुन्हा एकदा पाहा होत आहे ओपन
http://dgipr.maharashtra.gov.in/