You are currently viewing आमदार श्री वैभव नाईक यांनी आमसभा घेऊन जनतेची माफी मागावी

आमदार श्री वैभव नाईक यांनी आमसभा घेऊन जनतेची माफी मागावी

श्री विष्णू मोंडकर जिल्हा प्रवक्ते भाजपा सिंधुदुर्ग

 

मालवण :

 

कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातील जनता गेल्या दहा वर्षात मूलभूत विकासापासून वंचित राहिली असून त्याला पूर्णपणे जबाबदार आमदार श्री वैभव नाईक असून त्यांनी वास्तव स्थितीचे भान राखून बाकी नोंटकी न करता कुडाळ मालवण ची अनेक वर्षें प्रलंबित आमसभा घेऊन मतदार संघातील जनतेची माफी मागावी माजी खासदार श्री विनायक राऊत दोन वेळा खासदार झाले त्यावेळी भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्त्याच्या आणि भारतीय जनता पार्टी च्या विचारधारेला मानणाऱ्या मतदारांमुळेच आणि आज रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातील जनतेने ऊबाठा गटाला आणि श्री विनायक राऊत यांना त्यांची योग्य जागा दाखवली आहे आणि संपूर्ण कोकण महायुती मय झाला असून येणाऱ्या विधानसभेला यांची पुनरावृत्ती होऊन कुडाळ मालवण विधानसभेत श्री वैभव नाईक यांना पराभावाला सामोरे जावे लागणार आहे या जोडगोळीने स्वतः मतदार संघाच्या विकासासाठी कुठलेही नियोजन बद्ध काम न करता फक्त दहशत वादाचा खोटा बागुलबुवा करून मतदारांना दिशाहीन करून आपला स्वार्थ साधला वास्तविक पाहता कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघ जिल्ह्यातील तीन विधानसभे पेक्षा सामाजिक आर्थिक व्यावसायिक शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेला मतदार संघ आमदार म्हणून या मतदार संघाचा सर्वागिण विकास या मुख्य उद्धेशाने मतदारांनी बदल म्हणून आमदार श्री वैभव नाईक यांना निवडून दिले आज या मतदार संघात कुडाळ एम आय डी सी ओद्योगिक क्षेत्रात धडपडत आहे अनेक व्यवसाय बंद आहेत मच्छिमार समाजाचे पर्सनेट एलईडी या सारखे प्रश्न प्रलंबित आहेत पण या समाजाचे हे प्रश्न सोडून अनेक व्यावसायिक शैक्षणिक आर्थिक प्रश्न प्रलंबित आहेत आंबा काजू बागायतदार यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी काही काम झाले नाही कुडाळ मालवण ला शालेय मुलांच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी खेळण्याचे सरकारी मैदान नाही या मतदार संघातील मालवण ,तारकर्ली,वायरी,देवबाग,तोंडवळी सारखे समुद्र किनाऱ्याची ओळख स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी पर्यंटन दृष्टया जागतिक पातळीवर पोचविली असताना आजही हॉटेल ,होमस्टे ,जलक्रीडा व्यावसायिक यांच्या समोर पर्यटन क्षेत्रात अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे परंतु गेल्या दहा वर्षात आमदार श्री वैभव नाईक यांनी यासाठी राज्य मंत्री मंडळाच्या किंवा हे विषय मार्गी लावण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले नाहीत मतदार संघात व्यावसायिक आर्थिक उन्नतीसाठी कुठलेही नियोजन किंवा प्रयत्न नाहीत वास्तविक पाहता श्री वैभव नाईक यांचा उदय सन्मानीय खासदार श्री नारायण राणे साहेबांना विरोध करूनच झाला पण मा खासदार श्री नारायण राणे साहेब यांनी पंचवीस वर्ष उभ्या केलेल्या कामास अनुसरून तसूभर देखील मतदार संघाचा विकास श्री वैभव नाईक करू शकले नाहीत मतदार संघाला विकासापासून दूर नेले .एक आमदार म्हणून दहा वर्षांत काय करावे याचाच सूर गमावलेला हा आमदार जनता अनुभवत आहे श्री वैभव नाईक यांना महायुती चे कार्यकर्ते आणि मतदार संघातील मतदार 2024 ला योग्य जागा दाखवतील असे श्री विष्णू मोंडकर प्रवक्ते भाजपा सिंधुदुर्ग यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा